आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Space To Dispute Issue At Municipal Corporation School, Dlivya Marathi

लाठी शाळेत दोन वर्‍हाडांचा जागेसाठी वाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या खुल्या जागा आणि शाळा लग्न किंवा अन्य समारंभासाठी भाड्याने देण्यात येतात. शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरातील भा.क.लाठी विद्यालयाचे मैदान एकाच दिवशी दोन जणांना दिल्याने बुधवारी गोंधळ झाला. शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभारामुळे डोक्याला हात मारून घेण्याची वेळ आली.

पालिकेच्या लाठी शाळेचे पटांगण लग्न कार्यासाठी 7 मे रोजी भाड्याने मिळण्यासाठी मोतीलाल रामदास लोहार यांनी रितसर फी भरणा केली होती. प्रशासन अधिकारी अशोक पानसरे यांची स्वाक्षरी असलेली पावतीही त्यांना दिली होती. याच तारखेला शिक्षण मंडळ प्रशासनातर्फे चंद्रकांत मोतीराम वाणी यांना देखील मैदान भाड्याने दिले. दोघांनीही 1 हजार रुपये भाडे आणि 5 हजार रुपये अनामत रक्कम जमा केली आहे. जानेवारीत लग्नाचे ठिकाण निश्चित झाल्याने दोघांनीही पत्रिकेवर तेच ठिकाण टाकले आहे. 7 मे रोजी हळद आणि गुरुवारी लग्नाचा कार्यक्रम असल्याने बुधवारी सकाळी बुकिंग करणार्‍या दोघांनी शाळेत स्वयंपाकाचे साहित्य आणून टाकल्याने वाद सुरू झाला. दोघांकडेही रितसर फी भरल्याच्या पावत्या असल्याने दोघांनीही जागेसाठी दावा केला. शिक्षण मंडळाने करून ठेवलेला घोळ निस्तरण्यासाठी मुख्याध्यापिका मालती भंगाळे, शिक्षण मंडळ सदस्य हरीश आटोळे यांच्या उपस्थितीत तोडगा काढण्यात आला. एकाचे लग्न गुरुवारी दुपारी तर दुसरे गोरज मुहूर्तावर असल्याने दोघांनाही समजावून शाळेबाहेर दुसरा एक मंडप टाकण्याचा सल्ला देत समझोता घडवून आणण्यात आला.