जळगाव- शहरातीलरेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद चौकादरम्यानचा रस्ता रुंदीकरणासाठी महापालिकेने मुखर्जी संकुलातील गाळ्यांपाठोपाठ आनंदीबाई देशमुख शाळेच्या संरक्षक भिंतीवर हातोडा चालवला आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूला सभापती नितीन लढ्ढा यांच्या हॉटेलच्या बांधकामाला बाधा येऊ नये, म्हणून रस्ता तिरपा करण्याचा ‘प्लॅन’ पालिका प्रशासनाने बनवला असल्याचे समोर आले आहे.
रेल्वेस्थानक ते जिल्हा परिषद चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण करायचे म्हणून महापालिकेने या रस्त्यावरील बांधकामे काढण्याचा निर्णय घेतला आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. महापालिकेने मंगळवारी एका रांगेत असलेल्या बांधकामांपैकी आनंदीबाई शाळेची संरक्षण भिंत जेसीबीच्या साहाय्याने पाडली. त्यामुळे या शाळेतील सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे शाळेची भिंत पाडल्यानंतरही रस्ता सरळ होता तिरपाच होणार आहे. कारण दुसऱ्या बाजूला सभापती नितीन लढ्ढा यांच्या मालकीच्या हॉटेल बांधकामाचा अडथळा येणार आहे.
दोन्हीबाजूने काढावी लागतात बांधकामे
शहरातीलरस्त्यांचे रुंदीकरण करायचे असेल तर दोन्ही बाजूने करावे लागते. वाहतूक सुरळीत व्हावी, अपघात टाळता यावेत तसेच वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून रस्त्याचे रुंदीकरण केले जाते. मात्र, या ठिकाणी एकाच बाजूची बांधकामे काढून दुसरी बाजू कायम ठेवली आहे. यामुळे रस्ता रुंद होईल, पण तो तिरपा होईल.
रुंदीकरणाचे काम चुकीचेच
यारस्त्याचे रुंदीकरण तांत्रिकदृष्ट्या चुकीचे आहे, हे स्पष्टपणे दिसते. अशा पद्धतीने सुरू असलेले काम थांबवायला हवे. कोणी याला आव्हान दिले तर तांत्रिक माहिती देण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. नगररचना विभागाने या रस्त्याच्या चुकीच्या पद्धतीच्या रुंदीकरणाला विरोध करायला हवा होता. शिरीषबर्वे, आर्किटेक्ट
अधिकाराचा होतोय गैरवापर
कोणालाफायदा होईल, अशा पद्धतीने
आपल्या अधिकाराचा वापर सुरू आहे. चुकीच्या पद्धतीने बाजू मांडून निर्णय घेतला जात आहे. यापूवीर्ही रस्त्यांचे रुंदीकरण झाले. मात्र, कोणाच्या फायद्यासाठी विशिष्ट पद्धतीने मार्ग काढणे इतरांवर अन्याय करणे हा अधिकारांचा दुरुपयोग आहे. रेल्वेस्थानकाकडून उजवीकडची रांग एका रेषेत असून डावीकडील मालमत्ता मागे पुढे आहे. चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे. अश्विनीविनोद देशमुख, नगरसेविका,राष्ट्रवादी
समान न्यायाने काम व्हावे !
रस्तारुंदीकरणात बांधकाम किंवा अतिक्रमण असेल तर ते अडथळा येईल त्या दोन्ही बाजूंचे काढले पाहिजे. सर्वसामान्यांवर दबावतंत्राचा वापर करून इतरांसाठी अॅडजेस्टमेंट करण्याची भूमिका अयोग्य आहे. अन्यायकारक भूमिका घेऊन शाळा विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. रस्ता हा एका रेषेत तयार व्हायला हवा. डॉ.अश्विन सोनवणे, गटनेते,भाजप.