आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special 26 Style Loot, Robbery On Shop Of Bangali Workers

‘स्पेशल २६’ स्टाइल लूट, बंगाली कारागिरांच्या दोन दुकानांवर दरोडा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातील गजबजलेल्या रिधूरवाड्यात बुधवारी दुपारी ‘स्पेशल २६’ चित्रपटाच्या धर्तीवर अर्धा किलाे सोन्याची लूट करण्यात आली. नाशिकचे आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून सहा दरोडेखोरांनी दिवसाढवळ्या बंगाली कारागिरांच्या दोन दुकानावर दरोडा टाकून सुमारे १३ लाख ३० हजार रुपयांच्या सोन्याचे दागिने पळवले. भरदुपारी झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे खळबळ उडाली अाहे.

शहरात दिवसा चोऱ्या, घरफोड्या, सोनसाखळ्या चोरींचे प्रमाण वाढले आहे. त्यापार्श्वभूमीवर बुधवारी रिधूरवाड्यात हा धाडसी दरोडा पडल्याने घबराट उडाली आहे. दुपारी १२.३० वाजता पांंढऱ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स घातलेले पाच तरुण आणि लाल रंगाचा टी शर्ट घातलेला एक अशा सहा तरुणांनी अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने म्हणजे ‘स्पेशल २६’ चित्रपटात अक्षयकुमार त्यांचे साथीदार ज्याप्रमाणे सरकारी अधिकारी सांगून लुट करतात तशी लूट केली.

रिधूरवाड्यात पूर्वी मराठा दरबार अगरबत्तीचा कारखाना असलेल्या ठिकाणी नगरसेवक कैलास सोनवणे यांची दोन मजली इमारत आहे. त्यात दुसऱ्या मजल्यावर सोन्याचे दागिने बनवणारे बंगाली कारागीर राहतात. त्यातील ब्लाॅक क्रमांक मध्ये पुलक प्रधान यांच्या मालकीचे दागिने बनवण्याचे दुकान आहे. बुधवारी दुपारी १२.३० वाजता पाच तरुण पुलक यांच्या दुकानात घुसले. त्या पैकी एकाने दुकानातील एका कारागिरास ‘गुरू भाईका दुकान कौनसा है अशी विचारणा केली. त्याने बाजूचे दुकान असल्याचे सांगितले. तोपर्यंत दुसऱ्या चोरट्याने दरवाजा बंद केला. दरवाजा बंद करताच दरोडेखोरांनी दुकानातील कारागिर सपन प्रधान (वय ३५), सिंबास मांझी (वय २०), शिवशंकर जाना (वय २१), प्रसन्नजीत माहेती (वय १९) यांच्या मानेवर धारदार सुरे लावले. नंतर चौघांचे हात बांधून तोंडावर चिकटपट्ट्या लावल्या. स्वयंपाकघराजवळील पडदा कापून त्याचे तुकडे करून सर्वांच्या डोळ्यांवर बांधले. त्यानंतर ते बाहेर निघाले. बाजूला असलेल्या ब्लाॅक क्रमांक मध्ये गुरुदेव माहेती यांच्या दुकानाचा त्यांनी दरवाजा ठोठावला. तेथे ते ‘हम नाशिक इनकमटॅक्स डिपार्टमेंट से आये है’ असे सांगून आत शिरले. त्या ठिकाणी गुरुदेव माहेती, सोमेन पांजा (वय २५), संजय मलिक (वय २२), कुस्नुद मलिक (वय २३), समीर कोटल (वय १८), सुरजीत माहेती (वय २५), संदीप सामंत यांना चाकूचा धाक दाखवून सर्वांचे हात बांधले. नंतर माहेती यांच्याकडून त्यांनी व्यापाऱ्याचे स्वत:चे ५०५ ग्रॅम वजनाचे एकूण १३ लाख ३० हजारांचे दागिने ताब्यात घेऊन सातही जणांना पुलक प्रधान यांच्या दुकानात काेंडले. त्यानंतर चोरटे खाली उतरून नाल्याच्या दिशेने निघून गेले. थोड्या वेळानंतर कारागिरांनी स्वत: हत्याराने दरवाजा तोडून बाहेर आले आणि सर्व घटनेबाबत शनिपेठ पोलिस ठाण्याला माहिती दिली. दरम्यान, चाेरी झालेलेले दागिने एका व्यापाऱ्याला देण्यासाठी माहेती हा १८ जूनला शेगाव येथे जाणार होता. याप्रकरणी गुरुदेव माहेती यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
चोरटे दुपारी वाजून मिनिटांनी इमारतीत दाखल झाले होते अन् दुपारी वाजून ३३ मिनिटांनी चोरी करून फरार झाले. तब्बल २९ मिनिटे त्यांनी इमारतीत धुमाकूळ घातला होता.

चोरट्यांचा पेहराव
सहाचोरट्यांपैकी एकाने लालरंगाचा टीशर्ट घातला होता. तर इतर पाच जणांनी पांढऱ्या रंगाचे शर्ट आणि जिन्स पँट घातलेली होती. चोरटे २५ ते ३० वयाेगटातील होते. यातील दोघांच्या पाठीवर काळ्या रंगाची सॅक होती. चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधले असल्याने त्यांचे चेहरे कारागिरांना पाहता अाले नाहीत.

चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
चोरीकेल्यानंतर परत जाताना चोरटे अनिल सोनवणे यांच्या घरावर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्या फुटेजच्या आधारावर पोलिसांना चोरट्यांना पकडण्यास मोठी मदत होणार आहे.

श्वानपथकाद्धारे तपासणी
पोलिसांनाघटना कळल्यानंतर लागलीच शनीपेठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी, एलसीबीचे पथक, साहाय्यक पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, पोलिस निरीक्षक आत्माराम प्रधान घटनास्थ‌ळी पोहोचले. त्यानंतर श्वान पथक आले. श्वानाने नाल्यापर्यंत रस्ता दाखवला. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेची तीन पथके चोरांच्या शोधात रवाना झाली आहेत.
पुढे पाहा, संबंधित घटनेची छायाचित्रे...