आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास सुखाचा: मुंबई, नागपूर, शिर्डीसाठी विशेष एसी रेल्वेगाड्या, एेनवेळी प्रवास करणाऱ्यांना दिलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उन्हाळी सुट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांमध्ये गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासनाने हाॅलिडे स्पेशल गाड्या सुरू केल्या आहेत. त्यात मुंबई ते नागपूर, शिर्डी ते निजामुद्दीन या दाेन मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे ऐनवेळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कनफर्म आरक्षण मिळण्यास मदत होईल. 
 
सीएसटी-नागपूर: यामार्गावर विशेष रेल्वेगाडी सुरू करण्यात अाली अाहे. मुंबई-नागपूर सुपरफास्ट मुंबईहून २८ एप्रिलला रात्री ११.५५ वाजता सुटून नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता पाेहोचणार अाहे. तर नागपूर येथून ही गाडी (०२०७४)रविवारी (दि.३०) दुपारी १२.५० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३.२५ वाजता मुंबईत पाेहोचणार अाहे. 
 
मुंबई-नागपूर: यामार्गावर दुसरी रेल्वे गाडी (०२०७५) ही गाडी मुंबईहून मे राेजी रात्री १२.५५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी वाजता नागपूरला पाेहोचणार अाहे. तर नागपूर येथून मे राेजी दुपारी ४.१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१५ वाजता मुंबईत पाेहोचणार अाहे. दाेन्ही गाड्यांना कल्याण, इगतपुरी, भुसावळ, अकाेला, बडनेरा अाणि वर्धा येथे थांबा दिला अाहे. दाेन्ही गाड्यांचे अारक्षण २४ एप्रिलपासून सुरू झाले. 
 
साईनगर शिर्डी-हजरत निजामुद्दीन 
शिर्डीते हजरत निजामुद्दीन यादरम्यान साप्ताहिक विशेष एसी रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (०४४११) ही एसी विशेष गाडी २६ एप्रिल ते २८ जून या काळात धावणार आहे. शिर्डी येथून ही गाडी दर बुधवारी सकाळी १० वाजता सुटून दिसऱ्या दिवशी हजरत निजामुद्दीन येथे ९.४० वाजता पाेहोचणार अाहे. तर (०४४१२) ही एसी विशेष गाडी २५ एप्रिल ते २७ जून या काळात प्रत्येक मंगळवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री १२.१० वाजता सुटणार अाहे. ती दुसऱ्या दिवशी रात्री ११.१५ वाजता शिर्डीत पाेहोचणार अाहे. काेपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, इटारसी, हबीबगंज, झाशी, अागरा छावनी येथे थांबणार अाहे. अारक्षण २३ एप्रिलपासून सुरू झाले अाहे. प्रवाशांनी सुविधेचा लाभ घ्यावा. 
 
बातम्या आणखी आहेत...