आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त खडसेंच्या दबावाखाली , विशेष महासभेत नगरसेवकांचा खळबळजनक आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - मनपाआयुक्त संजय कापडणीस हे पालकमंत्री एकनाथ खडसे यांच्या दबावाखाली काम करतात. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावावरून ते स्पष्ट दिसून येते असा खळबळजनक आरोप खान्देश वकिास आघाडी आणि मनसेच्या नगरसेवकांनी बुधवारी विशेष महासभेत केला. या आरोपामुळे आयुक्त नगरसेवकांमध्ये जुंपली होती. दरम्यान, जप्त केलेल्या नऊ गाळ्यांच्याबाबत राज्य शासनाचा निर्णय मनपाच्या विरोधात गेल्यास उच्च न्यायालयात अपील करण्याचा ठराव बहुमताने मंजूर केला. अपील करण्यासाठी महापौर आणि उपमहापौर यांना अधकिार प्रदान केले.

खंडपीठाने गाळेधारकांना अनधकिृत ठरवल्यानंतर १० जूनला मनपाने सेंट्रल फुले मार्केटमधील गाळे सील केले होते. या कारवाईला दुपारनंतर पालकमंत्री खडसेंनी स्थगिती दलिी होती. आता खडसे आमदार डॉ. गुरुमुख जगवानी यांनी राज्यमंत्री रणजित पाटलांना पत्र देऊन सील केलेले गाळे परत ताब्यात देण्याची मागणी केली. त्यावर केव्हाही आदेश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारी तातडीची महासभा घेतली होती. यासभेत एकीकडे आयुक्त कापडणीस यांनी ते करीत असलेली कारवाई ही कायदेशीर असल्याचे म्हणत आहे. तर दुसरीकडे महसूलमंत्री खडसे बेकायदेशीर ठरवत आहेत. या मुद्यावर खाविआने प्रश्नांचा भडिमार करत नेमके खरे काय, याचा खुलासा मागितला. आयुक्तांनीही कलम ८१ ‘ब’नुसार दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कारवाईनंतरच गाळे ताब्यात घेतल्याचे स्पष्ट केले.

शहराची पाच लाख जनता वेठीस
आयुक्तांच्याबोलण्याचा आवेश पाहता हे राजकीय दबावाचे चित्र आहे. पालकमंत्र्यांकडून त्यांच्यावर प्रचंड दबाव असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत आहे. मात्र, आयुक्त तसे दाखवत नाहीत; हे वेगळे, असा आरोप नितीन लढ्ढा यांनी केला. त्यांच्यावरील दबावामुळे त्यांना मधुमेहाचा आजारही जडल्याचे उघड केले. राज्यमंत्र्यांना वेगवेगळे पत्र देणे, कारवाईला स्थगिती देणे हा एक दबाव प्रणालीचा भाग आहे. आयुक्तांनी गाळे सीलची कारवाई सुरू केली, ती कायदेशीर होती. तसेच त्यांच्या कर्तव्याचा भाग होता, असेही लढ्ढा यांनी सांगितले. मात्र, सध्या काही मूठभर लोकांच्या भल्यासाठी लाख जनतेला वेठीस धरले जात आहे. स्मार्ट सिटी करण्याएेवजी डर्टी सिटी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा टोलाही लगावला. आयुक्त खडसेंची बाजू सावरतात; त्यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारावे, असा चिमटाही घेतला.

फक्त बंगला बदलला
३५वर्षे सुरेशदादांची चलती होती, तेव्हा ‘७ शविाजीनगर’ येथून काम चालत होते. आता फक्त बंगला बदलला आहे. आता ‘मुक्ताई’ बंगल्यातून काम चालतेय असा आरोप जोशींनी केला. राष्ट्रवादीच्या नगरसेवकिा अश्विनी देशमुख यांनीही आता वेळ एकत्र येण्याची आहे. मी कोणत्या पक्षाची नसून जळगाव शहर माझा पक्ष आहे. कोणतीच स्थगिती नसेल तर सीलची कारवाई पुन्हा सुरू करा. आम्ही तुमच्या पाठीशी राहू. फक्त जणांवरच अन्याय का? इतर तर व्यवसाय करत आहेत. किती दविस व्यावसायकिांचे हित सांभाळणार, असा टोला लगावला.

आधी वाद, नंतर गमती-जमती
मनसेचेअनंत जोशी यांनी गाळे प्रकरणात खंडपीठाचे आदेश होऊन महिना उलटला तरी कारवाई केली नाही. आयुक्त दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला. मात्र, त्यावर आयुक्तदेखील आक्रमक झाले. श्वासही घेता आयुक्तांनी सर्व आरोप फेटाळून लावले. दोन वर्षांत प्रथमच आयुक्तांचा आवेश पाहायला मिळाला. मात्र, त्याच पद्धतीने जोशींनीही आपले म्हणणे मांडत आयुक्तांची दादागिरी खपवून घेणार नसल्याचे स्पष्ट केले. सभागृहात मला बोलू दलिे जात नसल्याचा आरोप जोशींनी केला. मात्र, काही वेळातच दोघांतील वाद नविळला आणि गमती-जमती सुरू झाल्या.

सभेत स्थगितीच्या आदेशावरूनही संताप
आयुक्तांच्याआगमनापूर्वी सभेत गाळे ताब्यात घेतल्यानंतर कोणाची स्थगिती आली. कोणाला आदेश प्राप्त झाले. लेखी होते की तोंडी यावरून सर्वपक्षीयांनी प्रश्नांचा भडिमार केला. पालकमंत्र्यांचे लेखी आदेश तर शाॅपिंग कॉम्प्लेक्स पाडण्यासंदर्भात होते मग स्थगिती दलिी कशी? असाही प्रश्न उपस्थित केला. या सर्व प्रश्नांचा खुलासा आयुक्त कापडणीस यांनी केल्यानंतर मात्र नगरसेवकांचे समाधान झाले.

भाजपवर ‘मनसे’ आरोप
ठरावालाविरोध करणाऱ्या भाजपला मनसेचे अनंत जोशी यांनी बारीक चिमटे घेतले. भाजपच्या उमेदवाराने गाळेधारकांना मालकी हक्काने गाळे देण्याचे आश्वासन दलिे होते. आज तुमची सत्ता आहे तरी इतका वेळ का लागतोय. फुले मार्केटमधून यापूर्वी आताही काही कोटी रुपये गोळा केले जाताहेत; ते कशासाठी, असा आरोप केला. विरोधी पक्षनेते वामन खडके यांनी यात राजकीय वास येत असल्याने तसेच विधानसभेत पराभव झाल्याने असे आरोप होताहेत, असे मत मांडत ठरावाला विरोध नोंदवला.

महासभेत मनसेचे नगरसेवक अनंत जोशी यांनी आयुक्त दबावाखाली काम करीत असल्याचा आरोप केला. त्यामुळे नेहमी हसतमुख मानले जाणारे आयुक्त संजय कापडणीस यांचा पारा चढला. या वेळी दोघांमध्ये शाब्दकि चकमकही उडाली.
बातम्या आणखी आहेत...