आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल भरण्यासाठी शहरात महिलांकरिता स्वतंत्र पंप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शहरातप्रथमच सागर पार्क शेजारील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरण्यासाठी महिलांकरिता स्वतंत्र पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी मीना सोनवणे माया मराठे ह्या महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. माया पेट्रोल भरण्याचे तर मीना कॅशियर म्हणून काम पाहत आहेत. शहरातील महिला वाहनधारकांसाठी प्रथमच अशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे महिलांचे धाडसही वाखाणण्याजोगी आहे.

यापूर्वी शहराबाहेर सावखेडा गावाकडील पेट्रोल पंपावर महिला कार्यरत होत्या. मात्र, जळगाव शहरात महिला पेट्रोल पंपावर प्रथमच काम करीत आहेत. त्यामुळे शहरातील महिलांसाठी हा वेगळा आदर्श ठरणार आहे. सकाळी ते १२ आणि दुपारी ते रात्री वाजेपर्यंत त्यांची कामाची वेळ आहे.

अनेकदा महिला उभ्या राहायच्या रांगेत
महिलाअनेकदा रांगेत उभ्या राहायच्या. दिवसभर नोकरी करून आल्यावर त्यांना घरी जाऊन परत काम करायचे असते. अशावेळी खूप वेळ रांगेत उभे राहणे योग्य नाही. कधी कोणत्या स्वभावाचा माणूस येईल हे माहित नाही. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून महिलांसाठी स्वतंत्र्य व्यवस्था करण्याची तयारी केली. जेणेकरून महिलांना अडचणीचे, गैरसोयीचे वाटू नये, यासाठी महिला कर्मचारी नियुक्त केले. तो पेट्रोल पंप फक्त महिलांसाठीच असेल, तेथे पुरुष पेट्रोल भरणार नाही. प्रकाशचौबे, संचालक,पेट्रोल पंप

स्त्रियांसाठी काहीतरी करायचेय
नववी उत्तीर्ण असलेल्या मीना सोनवणे यांच्या लग्नाला २२ वर्षे झाली आहेत. त्यांना एक मुलगा असून मुलीचे लग्न झाले आहे. महिलांसाठी मी काहीतरी करावे, अशी त्यांची इच्छा आहे. कुटुंबाची साथ मिळाली तर प्रत्येक गाेष्ट सहज करू शकतो. खरेतर पेट्रोल पंपावरील नोकरी खूप सुरक्षित आहे. काही प्रसंग घडला तरी सगळेजण मदतीला धावून येतील. एवढी मनात खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांसाठी सुरक्षित
माया मराठे या दहावी पास असून त्यांच्या लग्नाला १४ वर्षे झाली आहेत. दोन मुली एक १५ महिन्यांचा मुलगा आहे. पतीची साथ खूप मोलाची ठरली आहे. त्यांनी संपूर्ण ट्रेनिंग घेतलेले आहे. पेट्रोल पंपावर महिला आल्यावर खूप आश्चर्याने आमच्याकडे पाहतात. आमची विचारपूस करतात. पहिले पुरुषांच्या रांगेत उभे राहावे लागे. आता लवकर नंबर लागतो आणि सुरक्षितही वाटते. मुलींनाही आम्ही बिनधास्त पाठवू शकतो, अशा प्रतिक्रिया मिळत असल्याचे माया मराठे यांनी सांगितले.