आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आषाढी एकादशी: पांडुरंगाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- पंढरपुरात जाऊन पांडुरंगाच्या चरणी माथा टेकवणार्‍या भाविकांसाठी रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे. आषाढीनिमित्त पंढरपूरकडे जाण्यासह आणि पुन्हा परतीच्या प्रवासासाठी विशेष गाड्या उपलब्ध करून देण्याचा हा निर्णय आहे.

न्यू अमरावती आणि खामगाव स्थानकाहून 13, 14, 16 आणि 17 जुलैला या गाड्या चालणार आहेत. तर 14, 15, 20 आणि 21 जुलैला पंढरपूरहून या गाड्या अमरावतीकडे परतीचा प्रवास करतील. विशेष गाडी क्रमांक 01201 (डाऊन) न्यू अमरावती स्थानकाहून सहा जनरल कोच, प्रत्येकी एक एसी थ्री, स्लीपर आणि एसएलआरसह वरील तारखांना दुपारी 2 वाजता मार्गस्थ होईल. ही गाडी बडनेर्‍याला 2.28, मूर्तिजापूर 3.05, अकोला 4 वाजता, शेगाव 4.40, जलंबमध्ये 5 वाजता पोहोचणार आहे.

याच क्रमांकाची गाडी खामगाव स्थानकाहून प्रत्येकी एक एसी थ्री, स्लीपर आणि एसएलआर कोचसह नियोजित वेळापत्रकानुसार जलंब स्थानकावर येईल. जलंबमध्ये न्यू अमरावती स्थानकाहून सुटून उभ्या असलेल्या विशेष गाडीला हे सर्व कोच जोडले जातील. यानंतर तयार झालेली 19 कोचची स्वतंत्र गाडी पुढे 5.50 वाजता नांदुरा, मलकापूर 6.35, बोदवड 7.15, भुसावळ रात्री 8 वाजता, जळगाव 9, पाचोरा 9.40, चाळीसगाव 1015, नांदगाव 11.05 आणि मनमाडला रात्री 11.40 वाजता पोहोचेल. मनमाड स्थानकाहून निघालेली ही गाडी दुसर्‍या दिवशी सकाळी 9 वाजून 05 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचणार आहे.

मनमाडला ब्लॉक
मनमाड स्थानकावर पादचारी पुलाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे 9, 11, 13 आणि 15 जुलै रोजी स्थानकावर ब्लॉक आहे. यामुळे काही गाड्या उशिराने धावतील. 11 जुलैला गाडी क्रमांक 12142 (अप) राजेंद्रनगर-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस पानेवाडी स्टेशनवर सकाळी 10.10 वाजेपासून 10.50 वाजेपर्यंत (40 मिनिटे) थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक 11056 (अप) गोदान एक्स्प्रेस पानेवाडीत 10.25 11 वाजेपर्यंत (35 मिनिटे) थांबेल. 12859 (डाऊन) गीतांजली एक्स्प्रेस समिट स्टेशनवर 10.20 ते 10.50 थांबवल्याने अर्धा तास उशिराने धावेल

परतीचा प्रवास
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01202 अनुक्रमे 14, 15, 20, 21 जुलै रोजी दुपारी 4 वाजता पंढरपूरहून निघेल. ही गाडी रात्री 1.20 वाजता मनमाड स्थानकावर येईल. चाळीसगाव 3, पाचोरा 3.40, जळगाव 4.50, भुसावळ सकाळी 5.30 वाजेनंतर बडनेर्‍याला 10.10 वाजता पोहोचेल.