आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नवरात्री, धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त विशेष रेल्वेगाड्या; सुविधा मिळ‌णार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - नवरात्राेत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर ते पुणे मुंबईसाठी विशेष तीन गाड्या साेडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वसाधारण (जनरल) आणि आरक्षित अशा दोन्ही प्रकारच्या गाड्यांचा त्यात समावेश आहे. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईहून बनारस, गया जम्मुतवी या तीन लांबपल्ल्याच्या गाड्यादेखील सुरू होणार आहेत.
धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त राज्यभरातून नागपूर येथे जाणाऱ्या भीमसैनिकांची प्रचंड गर्दी हाेते. पुणे, मंुबई येथून नागपूरला जाणाऱ्यांची संख्यादेखील दखलपात्र असते. या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऑक्टोबरपासून तीन विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला अाहे. त्यात काही गाड्यांची एकेरी फेरी होईल. दुर्गाेत्सव दिवाळीच्या पार्श्वभूमीवरदेखील दर मंगळवारी मुंबई-बनारस (२५ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर), दर सोमवारी मुंबई-गया (२४ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर) आणि दर रविवारी मुंबई-जम्मुतवी (२३ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर) या तीन गाड्या सुरू होणार आहेत. या गाड्या लक्षात घेऊन प्रवाशांनी नियोजन करावे. वाढलेली गर्दी आणि ऐनवेळी आरक्षण मिळणे शक्य नसल्याने चिंतेत असलेल्या प्रवाशांचा प्रवास या गाड्यांमुळे अधिक सुखकर होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले अाहे.

नागपूर-पुणे स्पेशल
मुंबई-नागपूर पाठाेपाठ नागपूर-पुणे (०१०१४) ही एकेरी फेरीची स्पेशल गाडी ११ आणि १२ अाॅक्टाेबरला नागपूर येथून रात्री ९.३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी २.१० वाजता पुण्याला पोहोचेल. १६ जनरल आणि दोन एसएलआर डबे असलेली ही गाडी भुसावळ स्थानकावर पहाटे ३.१५ वाजता येणार अाहे. पुणे जाण्यासाठी ही गाडी फायदेशीर ठरेल.

संपूर्ण अारक्षित गाडी
मंुबई-नागपूरही सर्व अारक्षित डबे असलेली स्पेशल गाडी ऑक्टोबरला रात्री १२.२० वाजता मुंबईहून सुटून नागपूर येथे दुपारी २.३० वाजता पाेहोचणार अाहे. नागपूर येथून ११ अाॅक्टाेबरला रात्री ११ वाजता परतीचा प्रवास सुरू होऊन ही गाडी मुंबईला १२ अाॅक्टाेबरला दुपारी १.२० वाजता पाेहोचेल. १६ डबे असलेल्या या गाडीतून आरक्षण असेल तरच प्रवास करता येईल.

१० ऑक्टोबरला जनरल गाडी : मुंबई-नागपूरमार्गावर साेमवारी १० अाॅक्टाेबरला जनरल (सर्वसाधारण) गाडी सोडण्यात येणार आहे. जनरल तिकीट घेऊन कोणत्याही प्रवाशाला त्यातून प्रवास करता येईल. ही गाडी मुंबई येथून साेमवारी रात्री १२.२० वाजता सुटून नागपूरला दुपारी २.३० वाजता पाेहोचेल. या गाडीची एकेरी फेरी होईल, असे रेल्वे सूत्रांनी सांगितले. मुंबई-नागपूर मार्गावरील सर्वच माेठ्या रेल्वे स्थानकांवर ही गाडी थांबेल. दसऱ्यानिमित्त मुंबईवरून नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीमुळे दिलासा मिळणार आहे.
बातम्या आणखी आहेत...