आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उन्हाळी सुट्यांच्या काळात विशेष रेल्वेगाड्यांच्या होणार १४४ फेऱ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - उन्हाळी सुट्यांमध्ये प्रवाशांसाठी काही विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यात दादर-भुसावळ सुपरफास्ट साप्ताहिक, दादर-झाराप साप्ताहिक, एलटीटी-नागपूर सुपरफास्ट साप्ताहिक या गाड्यांच्या प्रत्येकी २६ फेऱ्या होणार आहेत. तसेच दादर-सावंतवाडीरोड गाडीच्या ४६ आणि एलटीटी-करमाली या विशेष साप्ताहिक गाडीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. अशा प्रकारे सुट्यांच्या काळात विशेष रेल्वेगाड्यांच्या १४४ फेऱ्या केल्या जाणार आहेत.

दादर-भुसावळ विशेष साप्ताहिक
(०१०८१)ही विशेष साप्ताहिक रेल्वेगाडी एप्रिल ते २४ जून या काळात दर शुक्रवारी दादरहून सुटेल. तसेच (०१०८२) ही गाडी एप्रिल ते २५ जून या काळात दर शनिवारी भुसावळ येथून सुटणार आहे. या गाडीला दादरहून येताना ठाणे, कल्याण, कसारा स्थानकावर थांबा आहे. तसेच गाडी इगतपुरी, नाशिकरोड, चाळीसगाव आणि जळगाव या स्थानकांवर थांबेल.

दादर-सावंतवाडी रोड साप्ताहिक
(०१०९५)ही विशेष रेल्वेगाडी १७ एप्रिल ते जून या काळात दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी दादरहून सुटेल. तसेच (०१०९६) ही रेल्वेगाडी १८ एप्रिल ते जून या काळात दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडीरोडवरून सुटेल. ठाणे, पनवेल आदी ठिकाणी थांबा आहे.

एलटीटी-लखनाै एसी सुपरफास्ट
(०२१०७)ही विशेष रेल्वेगाडी ते ३० एप्रिल या काळात दर शनिवारी एलटीटीहून सुटेल. तसेच (०२१०८) ही गाडी एप्रिल ते मे या काळात दर रविवारी लखनाै येथून सुटणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, हबीबगंज, झांसी, ओराई कानपूर या स्थानकांवर थांबा देण्यात अाला आहे.

एलटीटी-काजीपेठ साप्ताहिक
(०१०९३)ही विशेष रेल्वेगाडी ते २९ एप्रिल या काळात दर गुरुवारी एलटीटीहून सुटेल. तसेच (०१०९४) ही गाडी ते ३० एप्रिल या काळात दर शनिवारी काजीपेठ येथून सुटणार आहे. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसोल, लासूर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, किनवट, आदिलाबाद आदी रेल्वेस्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

नागपूर-अमृतसरएसी साप्ताहिक
(०२१२५)ही विशेष रेल्वेगाडी ते ३० एप्रिल या काळात दर शनिवारी नागपूरहून सुटेल. तसेच (०२१२६) ही गाडी एप्रिल ते मे या काळात दर सोमवारी अमृतसर येथून सुटणार आहे. या विशेष गाडीला भोपाळ, झांसी, ग्वालियर, आग्रा कँटोनमेंट, नवी दिल्ली, अंबाला, लुधियाना, जालंधर या स्थानकांवर देण्यात अाला थांबा आहे.

नागपूर-पुणे एसी साप्ताहिक
(०२१२४)ही विशेष रेल्वेगाडी ते २६ एप्रिल या काळात दर मंगळवारी नागपूरहून सुटेल. तसेच (०२१२३) ही गाडी ते २७ एप्रिल या काळात दर बुधवारी पुणे येथून सुटणार आहे. वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, भुसावळ, मनमाड, कोपरगाव आणि दौंड या स्थानकांवर या गाडीला थांबा आहे. त्यामुळे परिसरातील प्रवाशांची साेय हाेणार आहे.

एलटीटी-नागपूर साप्ताहिक
(०१०१७)ही विशेष रेल्वेगाडी एप्रिल ते २६ जून या काळात दर रविवारी एलटीटीहून सुटेल. तसेच (०१०१८) ही गाडी एप्रिल ते २६ जून या काळात दर रविवारी एलटीटीहून सुटणार आहे. इगतपुरी, नाशिकरोड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, धामणगाव, पुलगाव आणि वर्धा या स्थानकांवर तिला थांबा आहे.

एलटीटी-करमालीएसी सुपरफास्ट
(०१००५)ही विशेष रेल्वेगाडी एप्रिल ते जून या काळात दर शुक्रवारी एलटीटीहून सुटेल. तसेच (०१००६) ही गाडी एप्रिल ते जून या काळात दर शुक्रवारी करमाली येथून सुटणार आहे. ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडीरोड स्थानकांवर ितला थांबा आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात कोकणात पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा लाभ मिळणार आहे. राज्यभरातील प्रवाशांनी गाडीचे आरक्षण करून लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

दादर-झाराप विशेष साप्ताहिक गाडी
(०१०३३)ही विशेष रेल्वेगाडी १८ मार्च ते १५ एप्रिल या काळात दर रविवार, मंगळवार आणि शुक्रवारी दादर स्थानकावरून सुटेल. तसेच (०१०३४) ही गाडी १९ मार्च ते १६ एप्रिल या काळात दर सोमवार, बुधवार आणि शनिवारी झाराप स्थानकावरून सुटणार आहे. ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदे, अरवलीरोड, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूररोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ या स्थानकांवर थांबा आहे. प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा.
बातम्या आणखी आहेत...