आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाेलिसांच्या कारवाईनंतर अवघ्या १२ तासांत पुन्हा सट्टापेढी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जुने बसस्थानकाच्या मागच्या बाजूला असलेल्या एका सट्टापेढीवर बुधवारी सायंकाळी पाेलिसांनी धाड टाकून कारवाई केली हाेती. ही सट्टापेढी गुरुवारपासून पुन्हा ‘जैसे थे’ सुरू झाली आहे. त्यामुळे पोलिसांचा धाक संपल्याचे मोठे उदाहरण नागरिकांना पहायला मिळते आहे.
अप्पर पोलिस अधीक्षिका मोक्षदा पाटील यांच्या पथकाने बुधवारी सट्टापेढीवर धाड टाकून ३४ जणांना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही सट्टापेढी गुरुवारी पुन्हा सुरू झाली असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

सट्टापेढी चालक, मालक पोलिसांना जुमानता व्यवसाय सुरू करत असल्याचे हे जिवंत उदाहरण पाहायला मिळाले आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेली ही सट्टापेढी एका माजी नगरसेवकाची असल्याची माहिती समोर आली आहे.

बातम्या आणखी आहेत...