आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ईश्वर भक्तीनेच होईल मनुष्य जन्माचे सार्थक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मनुष्य देह मिळणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मनुष्य आहे. अशा या मनुष्य जन्माचे साध्य हे ईश्वर भक्तीनेच होऊ शकते.जगात आपली भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन स्थिरप्रज्ञानंद सरस्वती यांनी केले.

नंदनवन लॉन येथे श्रीनिवास झंवर परिवाराच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात त्या बोलत होत्या. कथा सोहळ्याच्या प्रारंभी स्थिरप्रज्ञानंद सरस्वती, मुकुंद झंवर व प्रिया झंवर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. सरस्वती म्हणाल्या, प्रत्येक जण आज आनंद व शांतीसाठीच झगडत आहे. शांतीचे स्थान आपले पुराण, वेद, उपनिशदे व भारतीय संस्कृतीमध्ये आहे. सध्याच्या कलियुगात प्रत्येकजणासाठी पैसा हा सर्वस्व झाला आहे. प्रत्येकजण पैसा कमावण्याच्या मागे लागलेला आहे. मात्र, भरपूर पैसे कमवले तरी कौटुंबिक व सामाजिक समस्या या दिवसेंदिवस वाढत आहेत. सुख-शांती मिळवण्यासाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. श्यामा मंत्री म्हणाल्या, श्रावण महिन्यात सुरू झालेल्या या कथा सोहळ्याचे विशेष महत्त्व आहे. या सोहळ्यातून भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या सोहळ्यासाठी या भागातील भाविक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.