आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र नोकरदारांचा नव्हे, तर उद्योजकांचा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महाराष्ट्रातील उद्योजकांनी एकत्न येऊन विचारांची आदान-प्रदान करून एकमेकांना मदत केली पाहिजे. यामुळे देशच नव्हे, तर सारे जग पादाक्रांत करता येईल. आता महाराष्ट्र नोकरदारांचा नाही तर उद्योजकांचा आहे, असे मत सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष माधव भिडे यांनी व्यक्त केले.

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट जळगाव शाखेतर्फे रविवारी श्रीकृष्ण लान्स येथे उद्योजक परिषद झाली. उद्घाटनप्रसंगी माजी आमदार आर.ओ. पाटील, रिझ्युम मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे संचालक गिरीश टिळक, अध्यक्ष व्ही.पी. कुळकर्णी, सचिव अभिजित वाठ, प्रकल्प प्रमुख छबिराज राणे उपस्थित होते. माधव भिडे म्हणाले, काळानुरूप उद्योजकांनीही बदलले पाहिजे. महाराष्ट्रातील उद्योजकांनी एकत्न येऊन एकमेकांशी संवाद साधला तर त्यातून यश निश्चित मिळेल. यश मिळाले तर आपण मोठे आणि र्शीमंत होऊ. एकमेकांविषयी असलेली तिरस्काराची भावना दूर सारून उद्योजकांनी एक व्हायला हवे. गुजराती, मारवाडी व अन्य समाजातील नागरिकांप्रमाणे मराठी माणूस विचारांमध्येच गुरफटून पडतो. ठोस निर्णय घेता येत नसल्याने तो मागे पडतो आहे. शमा सराफ यांनी सूत्नसंचालन केले. यावेळी उद्योगांविषयी माहिती देणारे स्टॉल लावण्यात आले होते.

ई-मेल हॅकचे प्रमाण वाढले
उद्घाटनापूर्वी ह्यबिझनेस नेटवर्किंग यावर उद्योजकांची कायर्शाळा झाली. गिरीश टिळक यांनी नेटवर्किंगचे फायदे तोटे सांगितले. ई-मेल सहज हॅक केले जातात. त्यामुळे उद्योजकांची महत्त्वाची माहिती मेलवर टाकू नये. यासाठी उद्योजकांनी स्वत:चे प्रोसेसर घ्यावे. आता तीन हजार रुपयात प्रोसेसर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. एकापेक्षा अधिक ई-मेल आयडी तयार करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.

अगोदर नियोजन करा
ग्रामीण तरुण उद्योगाकडे तर शहरी भागातील तरुण नोकरीकडे वळतो. मराठी तरुणांनी भीती दूर करून नवीन तंत्रज्ञान स्वीकारून उद्योग व्यवसायात उतरले पाहिजे. कुठलाही उद्योग सुरू करण्यापूर्वी त्याचे नियोजन झाले पाहिजे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील उद्योजकांना चांगले यश मिळू शकते. संत, थोरपुरुषांनी अगोदरपासूनच आपल्या मातीतच तसे पेरून ठेवल्याचे आर.ओ. पाटील यांनी सांगितले.

स्वत:शी स्पर्धा करा
समारोप अमरावतीचे उद्योजक संजय जाधव यांच्या हस्ते झाला. ते म्हणाले आपल्या उत्पादनात वेगळेपण असावे. आजपेक्षा भविष्याचा विचार करून स्वत: शिस्त लावून घेतली पाहिजे. अगोदर स्वत:शी स्पर्धा करा. या वेळी संजय प्रभुदेसाई, छबीराज राणे, अभिजित वाठ यांनी मनोगत व्यक्त केले. उद्योजक डी.डी. बच्छाव, एकनाथ चौधरी, अभिजित पाटील, सचिन बोरसे यांचा सत्कार झाला.

उद्योग उभारा
13 वर्षांत महाराष्ट्रातील दोन हजार नोकरदारांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला. यात सॅटर्डे क्लबचा खूप मोठा वाटा आहे. सध्या शेतीमालावर प्रक्रिया करून चांगला उद्योग उभारता येऊ शकतो. यासाठी उद्योजकांनी संशोधन केले पाहिजे. शेतीमालावर आधारित उद्योगांना मागणी आहे.