जळगाव - अहमदनगर येथे नुकत्याच झालेल्या ‘जैन फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत’ येथील जैन स्पोर्ट्स अकादमी व जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा खेळाडू रोहित पाटील याने एकाच स्पर्धेत नऊ फिडे मानांकित खेळाडूंशी खेळताना चार विजय, चार पराभव व एका बरोबरीसह साडेचार गुण मिळवून फिडे मानांकन मिळवण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. याच स्पर्धेत जैन अकादमीच्याच गुणवंत कासार, निरंजन पाटील, अक्षय सावदेकर या खेळाडूंनीही प्रतिस्पर्धी फिडे मानांकित खेळाडूंना पराभूत करून फिडे मानांकन प्राप्त करण्याच्या दिशेने घोडदौड सुरू ठेवली आहे. या सगळ्या खेळाडूंना प्रशिक्षक प्रशांत कासार, प्रवीण सोमाणी व प्रवीण ठाकरे यांचे मार्गदर्शन लाभले.