आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports Minister Valwi Speak About Sport, Divya Marathi

क्रीडा धोरणांमुळे खेळाडूंचे भविष्य उज्‍जवल : मंत्री वळवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - शासनाच्या क्रीडा धोरणामुळे खेळाडूंनाही शासकीय सेवेत वर्ग एक पदावर काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे, त्यामुळे खेळाडूंना उज्ज्वल भविष्य आहे. मात्र, खेळाडूंना मिळणार्‍या शासनाच्या सुविधेत क्रिकेटला दुय्यम स्थान देण्यात आले आहे, अशी भूमिका राज्याचे क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांनी स्पष्ट केली.
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे 2012-13 आणि 2013-14 मधील उत्कृष्ट खेळाडूंना सोमवारी जिमखाना डे अंतर्गत गौरवण्यात आले. कुलगुरू डॉ. सुधीर मेर्शाम अध्यक्षस्थानी होते. ऑलिम्पिक कुस्तीगीर नरसिंग यादव यांची विशेष उपस्थिती होती.

क्रिकेट खेळाबरोबरच इतर खेळांनाही महत्त्व आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा धोरणात भरीव निधीची तरतूद केली आहे. मात्र, क्रिकेट वगळता इतर खेळाडूंना शासकीय नोकरीची संधी आता मिळत आहे. बँका, विमानसेवा आदी सेवा क्रिकेटने काबीज केल्या आहेत. कुस्ती, नेमबाजसह इतर खेळांनाही वाव मिळावा, म्हणून शासनाने राज्य क्रीडा विकास निधी अंतर्गत 25 हजारांपासून ते 25 लाखांपर्यंतचा निधी उपलब्ध करून दिला आहे. क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना चांगले दिवस आहे. जुन्या कुस्तीगिरांची आर्थिक परिस्थिती आज हालाखीची आहे. त्यांच्यासाठीही शासनाने निधीची तरतूद केली आहे. आता खेळाडूंना दिशा देण्याचे काम पालक आणि प्रशिक्षकांनी करायला हवे, असे वळवी म्हणाले.
सचिनच्या तारखेसाठी विलंब
विद्यापीठात सचिन तेंडूलकर यांना आणण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यामुळेच जिमखाना डेला विलंब झाला, असे डॉ. अरविंद चौधरी यांनी स्पष्ट केले. मात्र, येत्या काळात सचिन यांना बोलावण्यात येईल. त्यासाठी कुलगुरू यांचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. या वेळी क्रीडा स्पर्धांमध्ये सर्वाधिक नऊ गुण मिळालेल्या पहिल्या नऊ महाविद्यालयांचा व अन्य खेळाडूूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच सर्वाधिक गुण मिळवणार्‍या महिला महाविद्यालयात डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाने सलग दोन वर्ष यश मिळवले. त्यांचाही सन्मान या वेळी झाला. या वेळी खेडाळूंसह प्राध्यापक उपस्थित होते.