आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनात धावणेदेखील महत्त्वाचे आहे’ अशी संस्कृती समाजात रुजायला हवी - अमाेद भाटेंचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - प्रत्येकाला लहानपणापासून धावणे, पाेहणे, सायकल चालवणे हे फक्त तेवढ्यापुरता शिकविले जाते; पण सगळ्या खेळांप्रमाणे हे सुद्धा फार महत्त्वाचे अाहेे. पालक मुलांशी बाेलताना मालिकांबद्दल बाेलतात; पण कधी या खेळाबद्दल बाेलत नाही. त्यामुळे धावण्याबाबत मुलांचा लहानपणापासूनच पाया मजबूत करायला हवा. तसेच जीवनात धावणे देखील महत्त्वाचे अाहे अशी संस्कृती समाजात रुजायला हवी, असे जर झाले तर निश्चितच भारतीय खेळाडू अजून नावारूपास येतील, असे प्रतिपादन अांतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटू अमाेद भाटे यांनी व्यक्त केले. 
 
राेटरी क्लब अाॅफ वेस्ट अाणि जळगाव रनर्स ग्रुपतर्फे गुरुवारी राेटरी हाॅल, मायादेवीनगर येथे ‘दाैड जिदंगी के लिए’ कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे धावपटू काैस्तुभ राडकर अमाेद भाटे यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डाॅ. पी. पी. पाटील, वेस्ट क्लबचे अध्यक्ष याेगेश भोळे, सचिव संजय इंगळे, डाॅ. राजेश पाटील, रनर्स ग्रुपचे किरण बच्छाव, डाॅ. रवी हिरानी उपस्थित हाेते. 
 
कार्यक्रमात मॅरेथाॅन पूर्ण करणाऱ्या रनर्स ग्रुपच्या ४२ सदस्यांचा सत्कार करण्यात अाला. या वेळी कुलगुरू पी. पी. पाटील म्हणाले की उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ ग्रुपला नेहमी मदत करेन. तसेच रनर्स ग्रुपच्या सहाय्याने लवकरच मॅरेथाॅनचे अायाेजन केली जाईल, असे सांगितले. ज्ञानेश्वर बढे यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. तृप्ती बढे यांनी अाभार मानले. 
 
काैस्तुभ यांनी तब्बल १६ वेळा ही स्पर्धा पूर्ण केली असून ११ तासांत त्यांनी हे अंतर पूर्ण केले अाहे. हे सगळे नियम पाळताना सगळ्यात महत्त्वाचे पाेषकतत्वे देखील असून काेणत्याही खेळाडू, धावपटूंसाठी हे अत्यंत महत्त्वाचे असते. दरराेज तुम्ही सराव करताना, खेळ खेळत असताना एक दिवस तुम्ही अाराम करणे महत्त्वाचे अाहे. एक सुटीचा दिवस नित्याने पाळायलाच हवा. 
 
ट्रायथलॉन ही स्पर्धा अत्यंत कठीण असते. दाेन ते अडीच हजार लाेक सहभागी असतात १७ तासांचा कालावधी ते देतात. समुद्रात ३.८ किमी पाेहणे नंतर १८० किमी सायकल चालवणे अाणि ४२ किमी धावणे अशी ही स्पर्धा असते. सकाळी सात वाजेपासून स्पर्धा सुरू हाेते. अनेक खडतर परिस्थिती तुम्हाला हे सगळे पार करावे लागते. 
 
अाठवड्यातून एक दिवस करा अाराम 
प्रत्येकाने ४५ ते ६० मिनिटे दरराेज व्यायाम करायलाच हवा. याेग्य अाहार असेल तर सप्लिमेंटची गरज नाही. अापल्याला अायुष्यात काय अाणि किती करायचे अाहे यासाठी ध्येय निश्चित करणे महत्त्वाचे असल्याचेही डाॅ. काैस्तुभ राडकर अमाेद भाटे यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...