आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कार्यक्षमता ओळखून करिअर निवडा, सृजन इन्स्टिट्यूटचे संचालक रासकर यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दहावी, बारावीत मिळालेल्या गुणांनुसार करिअरची निवड केली जाते. पालकही मुलांच्या गुणवत्तेचा विचार करून आपल्या परिचयातील मुलांनी कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेतला आहे, हे पाहून मुलांना त्या क्षेत्राकडे वळवतात. परंतु, असे करता मुलांनी स्वत:तील क्षमतांचा अभ्यास करून, त्या क्षमता आेळखून करिअर निवडावे, असे मत सृजन इन्स्टिट्यूटचे संचालक संतोष रासकर यांनी व्यक्त केले.
‘दिव्य मराठी’ आणि सृजन इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने "सृजन डिझायनिंग करिअर स्कॉलरशिप परीक्षा २०१५' रविवारी व.वा.वाचनालयाच्या सभागृहात झाली. या वेळी ते बोलत होते. या परीक्षेला इयत्ता दहावी, बारावी आणि पदवीनंतर अॅनिमेशन, फॅशन डिझायनिंग, इंटेरिअर या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
परीक्षेत यश संपादन करणाऱ्यांना १० हजार ते लाखांपर्यंतच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. या स्कॉलरशिपद्वारे ग्राफिक्स डिझाइन, वेब डिझाइन, अॅनिमेशन, व्हीएफएक्स, फॅशन डिझाइन, इंटेरिअर डिझाइन या अभ्यासक्रमासाठी मदत होणार आहे.
भविष्य काळाचा विचार करा
करिअर निवडताना दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. तुम्ही ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घेताय, त्यात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला संधी उपलब्ध असतील का? याचा विचार करा. तसेच ती उपलब्ध असलेली संधी आपल्याला चालेल का? स्थळ, काळ, वेळ यांचा सगळा विचार करून निर्णय घ्या. अनेक बदल होत असतात.
आता शिक्षण केले आणि शिक्षणानंतर नोकरीच मिळाली नाही, तर शिक्षणाचा काय उपयोग आणि दुसरे म्हणजे तुमचा कल कुठे आहे, तुमच्यातील क्षमता किती आहे. आवडीपेक्षा तुम्ही काय करू शकाल हे पाहावे. तसेच शिक्षण घेण्याचा उद्देशच कौशल्य विकसित करणे आहे, फक्त ज्ञान घेणे नाही. त्यामुळे आपल्यातील गुण कौशल्यांना प्रगल्भ करावे, असे रासकर यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...