आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ विद्यापीठ विजेते- फिरोदिया लॉ कॉलेजच्या संघाला द्वितीय बक्षिस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- एस.एस.मणियार विधी महाविद्यालयात आयोजित डॉ. जी.डी.बेंडाळे स्मृती १० व्या राष्ट्रीय अभिरूप न्यायालयाचा रविवारी समारोप झाला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत केरळच्या कोची येथील नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ अॅडव्हान्स लिगल स्टडीजच्या संघाने विजेतेपद पटकावले. विजेत्या संघास डॉ. बेंडाळे फिरता चषक, प्रमाणपत्र रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.
पारितोषिक वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अॅड. एस.एस.फालक होते. कार्यक्रमास मुख्य न्यायदंडाधिकारी एस.के.कुलकर्णी, अॅड. सत्यजित पाटील, न्यायाधीश आर.एम.मिश्रा, केसीई संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश पाटील, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. नारायण लाठी, व्यवस्थापन मंडळ सदस्य अॅड. सुनील चौधरी, प्राचार्य डॉ. बी.कुमार रेड्डी, समन्वयक डॉ. जयशंकर के.आय. यांची उपस्थिती होती. प्रा. डी.आर.क्षीरसागर यांनी विजेत्यांची घोषणा केली. प्रा.रेखा पाहुजा यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अपूर्वा दलाल पूजा शर्मा यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक के. आय. जयशंकर यांनी आभार मानले.
धुळ्याचा संघ तृतीय
यास्पर्धेत द्वितीय क्रमांक पुणे येथील फिरोदिया लॉ कॉलेज, तृतीय क्रमांक तिरुवअनंतपुरम येथील करेला अकॅडमी लॉ कॉलेजच्या पी.बी.श्रीप्रिया आणि धुळ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचा रविकुमार पाटील यांना मिळाला. यात सिम्बायोसिस लॉ स्कूलच्या संघाने चषक मिळवला.
सत्याचा संदर्भ महत्त्वाचा
न्यायाधीशसुमन ग्यानी यांनी समाजातल्या मागासलेल्या आणि दबलेल्या वर्गाच्या हक्कासाठी वकिली करण्याबाबत मार्गदर्शन केले. जगभरातील वर्णसंघर्षाचा संदर्भ देत भारतीय घटनेच्या अन्वयार्थासाठी सत्याचा संदर्भ महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. मणियार विधी महाविद्यालयात अभिरूप न्यायालय स्पर्धेतील विजयी स्पर्धकांसह प्राचार्य डॉ. युवाकुमार रेड्डी, न्यायाधीश सुमन ग्यानी, उपाध्यक्ष डॉ. प्रकाश पाटील, एस.के.कुलकर्णी, आर.एम.मिश्रा, प्रा. डी.आर.क्षीरसागर, डॉ. विजेता सिंग आदी.