आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून दहावीची परीक्षा; कॉपी प्रतिबंधासाठी 15 पथके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - बारावीच्या परीक्षेनंतर आता मंगळवारपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होत आहे. जिल्ह्याभरात १२७ केंद्रांवर ६४ हजार ४८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कॉपी प्रकारास प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात १५ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर डिबारची कारवाई कॉपीप्रकरणी मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जिल्ह्यातील उपद्रवी केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे, असे शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...