आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीच्या इंग्रजी पेपरला कॉपीपुढे यंत्रणा हतबल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- अँग्लो उर्दूजवळ सापडलेली कॉपी. दहावीच्या कठीण समजल्या जाणार्‍या इंग्रजीच्या पेपरला केंद्रांवर सर्रास कॉपी चालली. हा पेपर सोपा करण्यासाठी मदतनिसांनी नाना क्लृप्त्या लढवून विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवल्या. त्यांच्यापुढे बैठे पथकांनी अक्षरश: हात टेकले. दरम्यान, अशी स्थिती असतानाही केवळ चार विद्यार्थ्यांवरच कारवाई झाली. इंग्रजीचा पेपर मुलाने व्यवस्थित लिहावा यासाठी पेपरपूर्वी शहरातील केंद्रांवर पालकांची गर्दी दिसून आली. परीक्षा सुरू होताच केंद्रांवर शुकशुकाट होता खरा; पण कॉप्या पुरवणार्‍यांची धावपळ सुरू होती. त्यांनी नूतन मराठा महाविद्यालय, विद्यानिकेतन व ला.ना. सार्वजनिक विद्यालय या केंद्रांच्या भिंतींवर चढून कॉप्या पुरवल्या. तेव्हा पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. दरम्यान, चोपडा आणि कुरवेल येथील केंद्रांवर चार विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. उपशिक्षणाधिकारी अनिल सोनार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बैठे पथकही झाले फेल
प्रत्येक केंद्रावर असलेल्या बैठे पथकाचा काडीमात्रही उपयोग झाला नाही. कारण केंद्रांमध्ये सर्रास कॉपी चालली. त्यासाठी पर्यवेक्षक असलेल्या शिक्षकांचीही काही ठिकाणी मदत मिळाली. परीक्षा सुरू होताच तासाभराच्या आत प्रo्नपत्रिका बाहेर आली. त्यामुळे उत्तरांच्या झेरॉक्स करून त्या प्रती पोहोचवण्यासाठी उपद्रवींनी विविध पद्धती अवलंबल्या. कॉपीपुढे बैठे पथकही हतबल झाल्याची ओरड बैठे पथकातील एका कर्मचार्‍यानेच केली.
ला.ना. शाळेच्या भिंतीवरून उडी मारताना तरुण.