आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिझल्ट दहावीचा: नाशिक विभागात जळगाव जिल्हा तिसर्‍या स्थानी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - बारावीचा जाहीर झाल्यानंतर दहावीतही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले. नाशिक विभागातील दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यात जळगाव जिल्ह्याचा निकाल 80.86, तर शहराचा 73.38 टक्के लागला. यावल तालुका निकालाच्या टक्केवारीत सर्वांत तळाच्या स्थानी तर जळगाव तालुका अकराव्या स्थानी राहिला.

बोर्डातर्फे शुक्रवारी दुपारी 1 वाजता वेबसाइटवर निकाल जाहीर करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातून फ्रेश आणि रीपिटर मिळून एकूण 64 हजार 769 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी 64 हजार 671 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून 49 हजार 182 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाही मुलींनी निकालाची परंपरा कायम राखत मुलांच्या पुढे बाजी मारली आहे. पारोळा तालुकाही निकालात अव्वल ठरला आहे.

विभागात जिल्हा तिसर्‍या स्थानी

नाशिक विभागातून जळगाव तिसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. नाशिक जिल्ह्याचा निकाल 89.02 एवढा लागला असून, तोच विभागात अव्वल ठरला आहे. नाशिक विभागातील फ्रेश विद्यार्थ्यांमध्ये जळगाव जिल्ह्याचा 80.53, तर रिपिटर विद्यार्थ्यांचा 42.84 टक्के निकाल लागला आहे. शहरातून दोन शाळांचा निकाल 100 टक्के लागला. यात उज्ज्वल इंग्लिश स्कूल आणि रोझलँड इंग्लिश हायस्कूल या शाळांचा समावेश आहे. मेहरूण येथील माध्यमिक विद्यालयाचा निकाल 17.39 टक्के लागला आहे. हा शहरातील शाळांपैकी सर्वांत नीचांकी आकडा आहे.

शहरात साडेपाच हजार विद्यार्थी उत्तीर्ण

शहरात मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या एकूण 65 शाळा आहेत. त्यापैकी 15 शाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे. शहरातून फ्रेश आणि रिपिटर मिळून 7 हजार 722 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केले. पैकी 7 हजार 716 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून 5662 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शहराचा निकाल 73.38 टक्के लागला.


गणिताने उडवली दांडी
दहावीच्या निकालात बेस्ट ऑफ फाइव्हमध्ये विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली असली तरी गणिताने अनेकांची दांडी उडवली आहे. विभागात विषयान्वये लागलेल्या निकालात सर्वांत कमी निकाल गणिताचाच लागला. विभागातून 2 लाख 467 विद्यार्थ्यांनी गणिताचा पेपर दिला. पैकी 1 लाख 63 हजार 227 विद्यार्थी पास झाले. गणिताचा निकाल केवळ 81.42 टक्के लागला.

तालुकानिहाय टक्का
पारोळा 86.28
भुसावळ 83.16
रावेर 82.94
भडगाव 81.16
पाचोरा 80.86
चाळीसगाव 80.30
जामनेर 79.92
धरणगाव 78.91
अमळनेर 71.35
एरंडोल 71.31
जळगाव शहर 73.38
जळगाव तालुका 70.99
चोपडा 69.90
बोदवड 69.66
मुक्ताईनगर 65.80
यावल 61.90

बारावीनंतर दहावीतही मुलीच हुश्शार!
32,418 एकूण मुले

25,541 मुले पास

24,270 एकूण मुली

20,108 मुली पास