आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावी नापास विद्यार्थ्यांसाठी रोजगारक्षम कौशल्य योजना, शिक्षण संचालकांचे शिक्षण विभागास पत्र

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना कौशल्य विकास शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. इयत्ता दहावी फेर परीक्षेतील तीन किंवा यापेक्षा अधिक विषय नापास असलेल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाची संधी या ‘कौशल्य सेतू २०१६’ या उपक्रमातून प्राप्त होणार आहे. मात्र, या उपक्रमाकडे जिल्ह्यातील शाळांनी पाठ फिरवल्याची स्थिती आहे. विद्यार्थी मिळत नसल्याने शिक्षण विभागाने १३ डिसेंबरला बैठक बोलावली अाहे. यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापकांना या कामी जबाबदार धरले जाणार आहे.
राज्य मंडळ पुणे यांच्या पत्रानुसार जिल्ह्यातील १३८ शाळांमधून ३१९ विद्यार्थ्यांची नोंदणी अॅपद्वारे करणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप एकाही शाळेने नोंदणी केेली नाही. शिक्षण उपसंचालकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या नोंदणीची जबाबदारी मुख्याध्यापक लिपिकांवर सोपवली आहे. २०१६मधील नापास विद्यार्थ्यांना या कौशल्य सेतू योजनेचा लाभ मिळवून देण्याचे काम मुख्याध्यापक लिपिकांवर आहे.

मंगळवारी बैठक : योजनेबाबत१३ डिसेंबरला सकाळी १० वाजता मू. जे. महाविद्यालयातील स्वामी विवेकानंद भवन संगणक कक्ष येथे मुख्याध्यापकांची बैठक होणार आहे. मंगळवारची ऑनलाइन नोंदणीची अंतिम मुदत आहे. या वेळी शाळेचे रजिस्ट्रेशन झाल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक या कामी जबाबदार राहणार असल्याचे पत्र जि.प. माध्यमिक शिक्षण विभागाने काढले आहे.

कसे अाहे याेजनेचे स्वरूप
विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात ८० टक्के प्रात्यक्षिक २० टक्के आकलन अशा स्वरूपाचे शिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असलेला व्यावसायिक अभ्यासक्रम विद्यार्थ्याना घेता येणार आहे. यासाठी १५ अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. सहा महिन्यांचा कालावधी यासाठी आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना पंतप्रधान कौशल्य विकास योजना प्रमाणपत्र व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी मिळेल.

हे आहे कोर्सेस
ड्रेसडिझायनिंग, मेकॅनिकल ऑटोमोबाइल, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, कंपनी फूड प्रोसेसिंग, प्लम्बिग, स्युइंग मशीन आॅपरेटर, ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशियन, वेल्डिंग, शीट मेटल वर्कर, हेल्पर शटरिंग कार्पेटर यासह १५ विविध अभ्यासक्रमांच्या कोर्सेसमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. यातून स्वयंरोजगार, औद्याेगिक रोजगार व्यावसायिक अभ्यासक्रमाची संधी मिळणार आहे.

{ विद्यार्थ्यांना कौशल्य विकास कार्यक्रमासाठी स्वत:ची क्षमता ओळखण्यास मदत करणे.
{ यशस्वी भविष्य घडवण्यासाठी प्रेरणा देणे.
{ शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यावसायिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.
{विद्यार्थ्यांना कौशल्य विकासातून स्वयंरोजगारासाठी सक्षम करणे.
बातम्या आणखी आहेत...