आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसएसव्हीपीएसच्या प्राध्यापिकेची आत्महत्या

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - येथील श्री. शिवाजी विद्याप्रसारक संस्थेच्या डॉ. पां. रा. घोगरे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या गणित विषयाच्या प्राध्यापिकेने शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.

तासिका तत्त्वावर गणित विषयाचे अध्यापन करणार्‍या प्रा. शर्मिला प्रदीप पाटील (वय 32, रा. वृंदावन कॉलनी) यांनी शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्या साक्री येथील महाविद्यालयात कार्यरत असलेले प्रा. प्रदीप पाटील यांच्या पत्नी होत्या. गेल्या काही दिवसांपासून पती, एक मुलगा, एक मुलगी यांच्या समवेत भाड्याच्या घरात राहत होत्या. शनिवारी पती कामावर गेलेले असताना त्यांनी राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली.

शनिवारी गैरहजर
प्रा. पाटील गेल्या काही दिवसांपासून व्यथित होत्या. शनिवारी त्या कामावरही गेल्या नव्हत्या. प्रा. शर्मिला पाटील या सध्या पती समवेत भाड्याच्या घरात राहत होत्या. स्वत:च्या मालकीचे घराचे बांधकाम पूर्णत्वास आले होते. थोड्याच दिवसांत स्वत:च्या घरात ते जाणार होते. तत्पूर्वीच त्यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. चटका लावणार्‍या या घटनेचे गूढ मात्र अनाकलनीय आहे. त्यांनी आत्महत्या का केली यासंदर्भात माहिती समोर येऊ शकलेली नाही. पोलिस पुढील तपास करीत आहेत.