आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तोटा भरून काढण्यात ‘एसटी’ला डिझेल दरवाढीचा मोठा अडसर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाने नुकतीच कर्मचार्‍यांची वेतनवाढ केली. ही तूट भरून काढण्यासाठी प्रवास भाडेवाढही महामंडळाने नुकतीच जारी केली आहे. यातच आता पुन्हा डिझेलच्या दरवाढीमुळे महामंडळाला पुन्हा तोट्यात जावे लागणार आहे. डिझेलच्या दरवाढीमुळे जळगाव आगाराला दरमहा किमान पाच लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.


एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढून किमान स्थैर्य मिळवून देण्यासाठी महामंडळाने 6.40 टक्क्यांची भाडेवाढ केली. मात्र पेट्रोलियम विभागाने सोमवारी मध्यरात्रीपासून डिझेलच्या दरात वाढ केल्याने ही प्रवास भाड्यातील दरवाढ करूनही परिवहन मंडळाचा फारसा उपयोग होणार नसल्याची स्थिती आहे. डिझेल दरात प्रतिलिटर 61 पैशांनी वाढ झाली. परिणामी आगारातील बसेस व रोजचे अंतर यानुसार आगाराला दरमहा पाच लाखांचा फटका बसणार आहे. सहा महिन्यांपूर्वी महामंडळाच्या बसेसला जादा दराने डिझेल मिळत असल्याने आगाराने खासगी पंपावरून डिझेल घेणे सुरू केले होते. मात्र या दरातही वाढ झाल्याने महामंडळापुढे पुन्हा पेच निर्माण झाला आहे.

एसटीने भाडेवाढ केल्यानंतर एसटीचे उत्पन्न वाढेल, असा अंदाज केला जात होता. मात्र या डिझेल दरवाढीने हे अंदाज फोल ठरणार आहेत. नुकत्याच झालेल्या वेतनकरारात राज्यभरासाठी दोन हजार कोटी रुपये मोजावे लागणार होते. यासाठी भाडेवाढ अटळ होती. त्यामुळे 12 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र, रस्ते प्राधिकरणाने दुष्काळी स्थिती व महागाई लक्षात घेता 6.40 टक्के भाडेवाढ केली व ती लागूही झाली. ही भाडेवाढ लागू होत नाही तोच डिझेलच्या दरात प्रतिलिटर 61 पैशांची वाढ झाली. परिणामी भाडेवाढीतून वसूल होणारा पैसा डिझेलच्या दरवाढीमुळे खर्ची लागेल.

अडचण
महामंडळातर्फे प्रवास भाडेवाढ करूनही ‘जैसे थे’ परिस्थिती; जळगाव आगाराला दरमहा किमान पाच लाखांचा तोटा सहन करावा लागणार
>06 हजार 450 लिटर रोज लागणारे डिझेल
>07 रुपयांचा दरवाढीमुळे दररोज बोजा
>61 पैसे प्रतिलिटर डिझेलच्या दरात वाढ
>122 आगारात एकूण बसेस

दरवाढीचा फटका
प्रवासभाड्यात वाढ करताच डिझेलच्या दरात वाढ झाली. यामुळे पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती होईल. तसेच दरवाढीचा मोठा फटका जाणवणार आहेच. तो कमी करण्यासाठी प्रवाशांना आक र्षित करावे लागणार आहे. कमलेश धनराळे, स्थानकप्रमुख, जळगाव आगार