आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी बसमध्येही लवकरच तिकिटासाठी स्वाइप मशीनचा वापर करण्यात येणार ,विभाग नियंत्रक खिरवाडकर यांची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - वाहतूक सुरक्षिततेच्या विविध उपायांमुळे एसटीच्या अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यातच प्रवाशांचा एसटीकडे कल वाढत आहे. आगामी काळात लवकरच विभागात स्वाइप मशीनद्वारे ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू करणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी दिली. एसटीच्या वाहतूक सुरक्षितता सप्ताहाचे नुकतेच उद्घाटन करण्यात झाले.
 
राज्यात एसटी महामंडळातर्फे १० ते २५ जानेवारीदरम्यान वाहतूक सुरक्षितता सप्ताह साजरा केला जाणार आहे. या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी फीत कापून मोहिमेचे उद्घाटन केले. अवैध वाहतूक रोखण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही सांगळे यांनी दिले. आगार व्यवस्थापक एस.बी.खडसे यांनी एसटी चालकांच्या सतर्कतेमुळे अनेक अपघात टाळले गेल्याने एसटीचे नुकसान कमी झाल्याचे सांगितले. विभागातील १७४१पैकी १७०० चालकांना प्रबोधनासह विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ८९५ बसेसचे पुनर्निरीक्षण करून तपासणी करण्यात अाली आहे. यासह अपघातापोटी कोटी ८३ लाख रुपयांची भरपाई दिल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतना खिरवाडकर यांनी या वेळी दिली. 

२५ वाहनचालकांचा गौरव 
सुरक्षितवाहतुकीसाठी या वेळी विविध नियमांची माहिती देण्यात आली. सर्व वाहनचालकांना सुरक्षिततेची शपथ देण्यासह सुरक्षित सेवा देणाऱ्या २५ चालकांचा या वेळी गौरव करण्यात आला. गोपाळ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. यंत्र अभियंता प्रशांत वासकर, आगारप्रमुख शुभांगी शिरसाठ, उन्मेष शिंदे, स्थानकप्रमुख प्रमोद चौधरी, के.आर. मगरे, जे.डी.नाईक, दिलीप सूर्यवंशी, आबा जाधव, एम.जे.शिंदे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...