आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे- चाळीसगाव मार्गावर कंटेनरने बसची एक बाजू पूर्ण चिरली, १९ जण ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चाळीसगाव - दुचाकीला आेव्हरटेक करण्याचा प्रयत्नात भरधाव कंटेनरने समाेरून येणार्‍या चाळीसगाव-सुरत बसला जाेरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरने बसची चालकाकडची बाजू पूर्णपणे कापून काढली. चालकाच्या बाजूला बसलेले १८ प्रवासी जागीच ठार, तर १७ जण जखमी झाले आहे. हा अपघात गुरुवारी दुपारी २.१० वाजता सोलापूर महामार्गावरील चाळीसगाव-धुळे दरम्यान चिंचगव्हाण फाट्यानजीक घडला. सायंकाळपर्यंत ११ मृतांची आेळख पटली हाेती.

बालाजी वेफर्स कंपनीचे वेफर्स, कुरकुरे व चिवड्याची पाकिटे असलेला कंटेनर (एमएच ३९ सी २६३१) नवापूरहून चाळीसगावकडे येत हाेता. चिंचगव्हाण फाट्याजवळ त्याने समाेरून येणार्‍या चाळीसगाव-सुरत (एमएच १४ बीटी-२३५५) बसला जाेरदार धडक झाली. ती इतकी भीषण होती की, कंटेनर बसचालक केबिनच्या मागच्या सीटपासून तिरकसपणे बस चिरतच आत घुसला. अपघात होताच प्रवाशांच्या किंकाळ्या आणि आक्रोश कानी पडल्यावर ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मृतांत एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. अपघातात कंटेनरचा चालक कृष्णा सरगर ठार, तर बसचालक बचावला. जखमी प्रवाशांना चाळीसगाव व धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मृतांची नावे : शांताराम माेतीराम महाजन (वय ५०, रा.बाेरकुंड ता.जि.धुळे) त्यांची बहीण मथुराबाई माेतीराम महाजन (वय ३५, रा.बाेरकुंड), आशा वनसिंग गायकवाड (वय ३५, धुळे राेड, चाळीसगाव), पांगू भावडू साेनवणे (वय ४०, रा.उंबरखेड), उत्तम मांगू पवार (वय ५५, रा.शेवगे तांडा, ता.पाराेळा), बाबु साेनू राठाेड (वय ५५, रा.खेर्डे साेनगाव, ता.चाळीसगाव) पूजा राजेंद्र काठाेले ( वय ८ ,रा.खैरव ता. चिखली, जि.बुलढाणा), तिची आजी कलाबाई काेंडुबा काठाेले (वय ५५), विनाेद एकनाथ दरेकर (वय ३०, रा.वामननगर, चाळीसगाव) त्याचा सख्खा भाऊ कैलास एकनाथ दरेकर. या मयतांची आेळख पटली असून बाकींची आेळख पटविण्याचे काम सुरू हाेते.

कंटेनर चालक नवीनच
कंटेनरचा चालक कृष्णा सरगर (वय ३६, रा.भदाणे, ता. साक्री) हा बालाजी कंपनीत दाेन दिवसांपूर्वीच चालक म्हणून नाेकरीस लागला हाेता. ताे बुधवारी सकाळी नवापूर येथून १४० कि.मी. अंतर पार करून बलसाडला कंपनीचा माल भरण्यासाठी गेला हाेता. सायंकाळी सहा वाजता ताे बलसाडहून निघाला हाेता. बुधवारी रात्री ११ वाजता साक्री येथे कंटेनर चालकाने मुक्काम केला. सकाळी ९ वाजता ताे चाळीसगावकडे निघाला हाेता.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, एसटी बस आणि कंटेनरच्या अपघाताचे फोटो...