आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्रांक शुल्क चुकवला, मनपा, कृउबाला नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गाळे करार तत्त्वावर लिलाव करताना मुद्रांक शुल्क चुकवल्याच्या कारणावरून नाेंदणी मुद्रांक विभागाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये मनपा जळगाव बाजार समितीला नोटीस बजावल्या आहेत. त्याबाबत विभागाकडून मुद्रांक वसुलीची कार्यवाही सुरू केल्याची माहिती मुद्रांक जिल्हाधिकारी राजेश पाटील यांनी दिली आहे.
विविध व्यवहारांमध्ये मुद्रांक शुल्क चुकवणारे शासकीय कार्यालये बँका नाेंदणी मुद्रांक विभागाच्या रडारवर आहेत. जिल्हा परिषद, महामंडळे, विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच राज्य शासनाच्या नियंत्रणात असलेल्या ८६ प्रकारच्या कार्यालयांकडून देण्यात येणारे कामांचे ठेके, बीओटी तत्त्वावरील कामांबाबत तसेच महानगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायतींकडून करण्यात आलेले गाळे लिलावासंदर्भातही मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक असते. महानगरपालिकेने नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाला एक हजार गाळ्यांची यादी दिली आहे. परंतु, मनपाने गाळे लीजवर देताना मुद्रांक शुल्क भरल्याप्रकरणी मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. कोणकोणत्या प्रकरणांमध्ये मुद्रांक शुल्क वसूल करता येईल, त्यानुषंगाने नोंदणी मुद्रांक विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बँका इतर शासकीय कार्यालयांनी चुकवलेला मुद्रांक शुल्क वसूल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी राजेश पाटील यांनी सांगितले.

जळगाव बाजार समितीने ७५ गाळ्यांचा लिलाव केला होता. हा लिलाव करताना मुद्रांक शुल्क भरला नाही. त्यामुळे मुद्रांक जिल्हाधिकारी पाटील यांनी बाजार समितीला नोटीस बजावली आहे. गाळे लिलाव प्रकरणामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीकडून लाख ८६ हजार ८४० रुपयांचा मुद्रांक शुल्क वसूल करण्यात आला आहे.

मनपाकडे काही गाळ्यांच्या लीजची नोंद नाही
मनपाकडून नोंदणी मुद्रांक विभागाने व.वा.मार्केटमधील एक हजार गाळेधारकांची यादी घेतली आहे. या यादीनुसार मनपाने एक हजार गाळेधारकांना ५० वर्षांच्या लीजवर गाळे दिलेले आहेत. त्यामध्ये बहुतांश गाळेधारकांना गाळे लीजवर देण्याबाबत नोंदणी मुद्रांक विभागाला आढळून आलेली नाही. मनपाने त्या वेळी गाळेधारकांकडून घेतलेल्या प्रीमियमच्या रकमेवर मुद्रांक शुल्क घेतले जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...