आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Standard Third, Fourth, Fifth Students Get New Book From June

जून महिन्यात येणार बालभारतीची नवीन पाठय़पुस्तके

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - शालेय वर्ष 2014-2015 या वर्षात इयत्ता 3 री, 4 थी व 5 चा नवीन अभ्यासक्रम येणार असून जून 2013 ला बालभारतीची पुस्तके बाजारात येतील. बदलणार्‍या अभ्यासक्रमात विदय़ार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान व ज्ञानाचा नवीन खजिना उपलब्ध होणार आहे.

यासंदर्भात महाराष्ट्र पाठय़पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ‘बालभारती‘ यांच्या वतीने परिपत्रक जारी केले असून पाठय़पुस्तके बदलाबाबत राज्यातील सर्व अधिकृत पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांना सूचना देण्यात आल्या आहेत. जून 2014 मध्ये इयत्ता 3 री, 4 थी, 5 वीची पुस्तके बदलणार आहेत तर जून 2015 इयत्ता 6 वी, 7 वी, 8 वीची पाठय़पुस्तके बदलणार आहेत.

नोंद घेण्याची सूचना
बदलणार्‍या पाठय़पुस्तकाबद्दल शासनाने परिपत्रकाद्वारे सर्व पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्था व इतरांना कळवले आहे. त्यांनी त्याची नोंद घ्यायला हवी, जेणेकरून पाठय़पुस्तकांचा अनावश्यक साठा शिल्लक राहणार नाही. वाल्मीक पगार, व्यवस्थापक, बालभारती.

नवीन अभ्यासक्रमाचे स्वागत
मुलांना नवीन अभ्यासक्रम नवीन पुस्तके म्हटले की एक वेगळाच आनंद असतो. बदलणार्‍या जगाप्रमाणे मुलांनाही नवीन शिकायला मिळते. त्याचे आम्ही स्वागतच करीत आहोत. अश्विनी साळुंखे, पालक