आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Standing Committee Chairman Nitin Barade Of Staff Advice

मी भूत आहे, सकाळीच घराबाहेर पडतो, प्रामाणिकपणे काम करा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - आरोग्य विभागातील आढावा घेताना नवनिर्वाचित सभापतींनी वाहने किती वाजता पोहोचतात, कामगार किती वेळ काम करतात मुकादम तसेच निरीक्षक रस्त्यावर फिरतात का? असा प्रश्न केला. तर मी ‘भूत’ आहे. सकाळीच घराबाहेर पडतो, त्यामुळे मला सगळ्या गोष्टींची कल्पना आहे. कोणी काहीही सबब सांगण्याची गरज नाही. फक्त प्रामाणिकपणे काम करा, असा सल्ला नवनियुक्त स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी दिला आहे.
सण-उत्सवांचे दिवस असल्याने शहरातील साफसफाईच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी सभापती बरडे यांनी आरोग्य विभागाची सभा बोलावली होती. या वेळी उपमहापाैर सुनील महाजन, प्रभाग समिती सभापती अजय पाटील, नितीन नन्नवरे, सुनील चुडामण पाटील, मनसेचे अनंत जोशी, चेतन सनकत आदी उपस्थित होते. याप्रसंगी महापालिका अडचणीत असून आर्थिक परिस्थिती नाजूक अाहे. परंतु त्याचा साफसफाईवर परिणाम होण्याचे कारण नाही. चांगल्या काळात प्रत्येकाची साथ असते परंतु वाईट काळात सहकार्य करा. हे तुमचेही शहर आहे. आपलेच लोक शहरात राहतात. या शहरासाठी काहीतरी देणे आहे, या भावनेतून काम करण्याचे आवाहन सभेत करण्यात आले.

बंदवाहने तत्काळ दुरुस्त करा
पालिकेच्याआरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची ड्यूटी सकाळी वाजता सुरू होते आणि दुपारी वाजता संपते. परंतु अनेक अधिकारी नेमलेल्या ठिकाणी जात नाहीत. कर्मचारी वेळेआधीच घरी निघून जातात. त्याचा परिणाम साफसफाईवर होतो. त्यामुळे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आठ तास काम केलेचे पाहिजे. यासह बंद असलेली वाहने दोन दिवसात दुरुस्त करा, वाईट प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांना त्यांची जागा दाखवली जाईल, असेही बरडे यांनी सांगितले.

जबाबदारीचोख पार पाडा
शहराचाविस्तार वाढतोय. त्या तुलनेत कामगार वाहनांचा तुटवडा आहे. परंतु सणासुदीच्या काळात जबाबदारी चोख पार पाडायची आहे. मी स्वत: प्रत्येक युनिटला भेट देणार आहे. प्रभाग अधिकारीही कामाला लागतील, नगरसेवक रस्त्यावर उतरणार अाहेत. तक्रारी यायला नकोत, अशा शब्दात बरडे यांनी जाणीव करून दिली.

रजेवर जाण्यासाठी वाहने नादुरुस्त करतात
आरोग्याधिकारीउदय पाटील यांनी आपल्याच विभागातील गैरप्रकारावर प्रकाश टाकला. काही कर्मचारी रजेवर जाण्यासाठी वाहन खराब करतात. तर काहींचे वाहन बदलले म्हणजे दुसऱ्या दिवशी वाहनात काही तरी बिघाड होतोच, अशा वाईट प्रवृत्तीही आरोग्य विभागात बळावल्या आहेत. त्यांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. यामुळे विभाग बदनाम होतो, अशी व्यथा पाटील यांनी मांडली.

दोन दिवसांत वाहनांची दुरुस्ती व्हायला हवी
आरोग्यविभागात ५४३ कामगार असून ९१ वाहने आहेत. यापैकी १८ वाहने नादुरुस्त आहेत. काही वाहने अत्यंत किरकोळ कारणांमुळे महिनाभरापासून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. आरोग्याधिकाऱ्यांना हजार रुपये खर्चाचे अधिकार आहेत. परंतु बॅटरीच्या कारणामुळे वाहन बंद राहण्यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. दोन दिवसांत सर्व वाहने दुरुस्त करा, असा दम या वेळी अधिकाऱ्यांना देण्यात आला.

स्वच्छतेसाठीआता संपूर्ण शहरात फिरणार
नवीनसभापती आहेत. दोन दिवस कामाचा उत्साह राहील, नंतर पुन्हा शांत होतील, या भ्रमात राहू नका. वॉर्डात फिरणे ही आमची सवयच आहे. आता संपूर्ण शहरात फिरणार आहे. त्यामुळे आता दिलेल्या सूचनांचे पालन होत आहे की नाही? यावर बारीक लक्ष राहणार आहे. चुका लक्षात आल्या म्हणजे कुणाचीही गय केली जाणार नाही, असेही त्यांनी सुनावले. तर आरोग्याच्या प्रश्नावर आता नेहमी सभा बैठका होत राहतील.

आरोग्य विभागाच्या सभेत बोलताना स्थायी समिती सभापती नितीन बरडे. समवेत उपमहापाैरसुनील महाजन, अजय पाटील, नितीन नन्नवरे.