आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्थायी समितीत सत्तेसाठी तापतेय राजकारण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर सत्तेत असलेल्या महापालिकेची तिजोरी तरी ताब्यात राहावी म्हणून खाविआने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच त्यासाठी राष्ट्रवादी मनसेशी संपर्क सुरू केला आहे. दुसरीकडे मात्र प्रशासकीय पातळीवर गटनेत्यांची बैठक घेऊन सदस्यांच्या निवडीसाठी महासभेची तारीख सुचवावी म्हणून महापौरांना पत्र देण्यात आले आहेत. महापालिकेत महापौरांना जेवढे महत्त्व तेवढेच स्थायी समितीच्या सभापतींना असते. त्यामुळे सभापतिपद मिळवण्यासाठी नेहमीच जोरदार मोर्चेबांधणी होत असते तोच अनुभव यंदाही येणार आहे. स्थायी समितीचे आठ सदस्य नुकतेच निवृत्त झाले आहेत. त्यात सत्ताधारी खान्देश विकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. सहा सदस्य निवृत्त झाल्याने दोन सदस्य असलेल्या खाविआला जनक्रांतीच्या मदतीने चार सदस्य स्थायीत पाठवता येणार आहे. मात्र, यंदा जनक्रांतीचे दाेन नगरसेवक कोणाला साथ देतात? यावर गणित अवलंबून राहणार आहे. जनक्रांतीने मदत केल्यास खाविअाचे सहा सदस्य होतील. सत्तेसाठी तीन सदस्यांची गरज भासणार असून, भाजपचे मनसेचे सदस्य राहणार आहेत. मात्र, दोन्ही एकत्र आले तरी त्यांना बहुमतासाठी सदस्यांची गरज भासणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांवर खरी मदार राहणार आहे.