आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थिक स्थितीचा बाऊ करू नका!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रत्येक सभेत अार्थिक स्थितीमुळे खर्च करता येत नसल्याचे उत्तर एेकून त्रस्त झालेल्या नगरसेवकांनी स्थायी समितीत प्रशासनाची चांगलीच खरडपट्टी काढली. वारंवार अार्थिक परिस्थितीचा बाऊ केला जाताे. दाेन चार हजार रुपयांसाठी वाहनांची दुरुस्ती थांबली अाहे. इतकाही खर्च करू शकेल, अशी पालिकेची परिस्थिती आहे का? असा सवाल करत प्रशासनाने जबाबदारीने उत्तर द्यावे, असा सल्ला देण्यात अाला.
मनपा स्थायी समितीची सभा शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता सभापती ज्याेती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पहिल्या पाच मिनिटांत अजेंड्यावरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. उर्वरित अर्धातास शहरातील समस्यांवर चर्चा झाली. सभेत शहरातील २४ चौकांतील स्वयंचलित वाहतूक नियंत्रकाची देखभाल दुरुस्तीसाठी वरद इलेक्ट्रिक्स या मक्तेदाराला ३० दिवसांची मुदत देण्यात अाली. सुनील माळी यांनी काही सिग्नल बंद असल्याची तक्रार केली असता वीज विभागाचे प्रमुख सुशील साळुंखे यांनी शहरातील केवळ एकच सिग्नल बंद अाहे, बाकीचे िब्लंकरवर सुरू असून वाहतूक पाेिलसांच्या कमतरतेमुळे ते सिग्नल माेडमध्ये नसल्याचे स्पष्ट केले. राजू माेरे यांनी माेकाट कुत्र्यांचा प्रश्न उपस्थित केला. संताेष पाटील यांनी पथदिवे बंद असल्याचा मुद्दा मांडला.
नगरसेवक डायरी अालीच नाही
अायुक्तांनीअादेशानंतरही नगरसेवकांकडे नगरसेवक डायरी स्वाक्षरी आली नसल्याची तक्रार अमर जैन यांनी केली. अाराेग्याधिकारी उदय पाटील यांनी तक्रारींचा निपटारा करून नगरसेवक डायरी नगरसेवकांकडे सादर केली जाईल, असे सांगितले. स्वाक्षरीसाठी तारीख ठरवण्याची सूचना करण्यात अाली अाहे.

१५दिवस जेसीबी द्या, खर्च मी करतो
नगरसेवकराजू पटेल यांनी त्यांच्या भागातील खड्डे बुजवण्यासाठी रस्त्याचे काम करण्यासाठी तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नाही, त्यामुळे मनपाने पैसे नाहीत म्हणून कामे थांबवू नयेत. वेस्ट मटेरिअल टाकण्यासाठी अार्थिक अडचण कुठे अाहे? असा सवाल केला. १५ दिवस ट्रॅक्टर जेसीबी द्या; संपूर्ण खर्च मी करताे वाॅर्डातील सगळी कामे अाटाेपून घेताे, असा प्रस्ताव ठेवला. वाहने नादुरुस्त असल्याचे कारण पुढे करत उपायुक्त गांगाेडे यांनी ‘पैशांचे साेंग करता येत नाही, जे अाहे ते स्वीकारावे लागेल’ असे उत्तर िदले. त्यावर सदस्य नितीन लढ्ढा यांनी जबाबदारीने उत्तर देण्याची सूचना केली. वाहने दुरुस्तीसाठी दाेन चार हजार खर्च लागताे, तेवढाही खर्च करू शकत नाहीत का? केवळ अार्थिक बाबींचा बाऊ करू नये, असे अावाहन केले.