आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन बीजे मार्केट चकाचक, ‘आय लव्ह क्लीननेस’ म्हणत 37 टन कचरा काढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दाऊदी बोहरा समाजाने ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर शहरात स्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला. ‘आय लव्ह क्लीननेस’ म्हणत नवीन भिकमचंद जैन मार्केटमधून ३७ टन कचरा बाहेर काढला. समाजबांधवांनी हाती खराटे, फावडे, टोपल्या, डस्टबिन घेत मार्केट चकाचक केले. त्यासाठी त्यांना महापालिकेच्या आरोग्य विभागानेदेखील सहकार्य केले. ही साफसफाई मोहीम एका दिवसापुरती मर्यादित नसून पायलट प्रोजेक्ट म्हणून नवीन भिकमचंद मार्केट दत्तक घेण्यात आले.
देशभरात व्यापारी संकुलाचे आदर्श मॉडेल असलेल्या नवीन भिकमचंद जैन मार्केटमध्ये कानाकोपऱ्यात प्रचंड कचरा साचलेला होता. सकाळी वाजेपासून अभियान सुरू झाले. त्यात बोहरा समाजातील आठ ते दहा वर्षांच्या मुलांपासून साठी ओलांडलेल्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. कचरा बाहेर नेण्यासाठी पालिकेचे दोन ट्रॅक्टर, तीन डंपर कार्यरत ठेवण्यात आले होते. या व्यतिरिक्त बोहरा समाजातर्फे मोहिमेसाठी एक ट्रॅक्टर एक जेसीबी स्वखर्चातून लावले होते. पालिकेचे आरोग्य अधिकारी उदय पाटील, आरोग्य निरीक्षक एस.पी.अत्तरदे, एन. ई. लोखंडे, एन.एम.साळुंखे हे अभियानस्थळी मदत करण्यासाठी उपस्थित होते. मार्केट परिसरातून चार तासांत ३७ टन कचरा उपसण्यात आला. अभियानाचे मार्गदर्शन शेख शब्बीर बंुदीवाला, बोहरा समाजाचे सेक्रेटरी शेख मोइझ लेहरी, स्वच्छता कमिटीचे प्रमुख युसूफ मकरा, शेख मोइज आरसीवाला यासह बोहरा समाजातील तरुणांच्या संघटना बुरहानी गार्ड इंटरनॅशनल, शबाब दुजहाबीमधील युवकांसह सुमारे शंभरावर बोहरी बांधव सहभागी झाले होते
नवीन भिकमचंद जैन मार्केट परिसरात साफसफाई करताना दाऊदी बाेहरा समाजबांधव.

पुढे कसे आहे नियोजन?
पहिल्याटप्प्यात साचून असलेला कचरा उपसून काढत मार्केट क्लीन करण्यात आले आहे. काही व्यावसायिकांना प्रातिनिधिक स्वरुपात थर्माकोलच्या कचराकुंड्या देण्यात आल्या आहेत. मार्केटची रचना करताना हिरवळीसाठी सोडलेल्या जागी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यासाठी १५-१५ तरुणांची चार पथके तयार केली आहेत. दर अाठवड्याला एक पथक जाऊन स्वच्छता करून हिरवळीसाठी पाठपुरावा करणार आहे.