आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घनकचरा प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली, नियाेजन करणाऱ्यांवर कारवाईची शिफारस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- महापालिकेच्या अाव्हाणे शिवारातील घनकचऱ्यासंबंधी विशेष लेखापरीक्षणात अाक्षेप नाेंदवण्यात अाले अाहेत. यात २००३ ते २०१० या कालावधीत घनकचऱ्याचे नियाेजन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात अाली अाहे. त्यामुळे महापालिका प्रशासन घनकचरा प्रकल्प तातडीने सुरू करण्याच्या विचारात अाहे. यासंदर्भात तातडीने अहवाल सादर करण्याचे अादेश अायुक्तानी दिले अाहेत.

शहरापासून पाच किलाेमीटर अंतरावर असलेल्या अाव्हाणे शिवारात महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प अाहे. हा प्रकल्प हंजीर बायाेटेक या कंपनीला चालवायला दिला हाेता. परंतु जून २०१३ पासून हा प्रकल्प बंद पडला अाहे. प्रकल्प सुरू करण्याबाबत हंजर बायाेटेकसाेबत अजूनही चर्चा सुरू अाहे. मात्र, प्रकल्प सुरू हाेऊ शकलेला नाही. प्रकल्प सुरू करून शास्त्राेक्त पद्धतीने प्रक्रिया करण्याचे अादेश यापूर्वी अनेकदा अायुक्तांनी दिले हाेते. परंतु त्यासंदर्भात काेणताही अहवाल अाराेग्य विभागाने सादर केलेला नाही. त्यामुळे अायुक्तांनी शहर अभियंता अाराेग्याधिकाऱ्यांना अादेश देऊन प्रकल्प सुरू करण्यासाठी तत्काळ अहवाल सादर करण्याचे अादेश दिले अाहेत.

लाेकलेखा समितीने नोंदवला अाक्षेप
घनकचऱ्यासंबंधीप्रधान महालेखाकारांनी अाक्षेप नाेंदवला अाहे. विधानमंडळ लाेकलेखा समितीने या अाक्षेपानुसार २००३ ते २०१० या कालावधीत घनकचऱ्याचे नियाेजन केल्यामुळे करार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस केली अाहे. याबाबत तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या अाहेत. त्यामुळे याप्रकरणी चाैकशी करून अहवाल देण्याचे अादेश मुख्य लेखापरीक्षक अास्थापना अधीक्षकांना दिल्या अाहेत.