आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Assembly Election, Raver Seat, Sharad Pawar Comment

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रावेरची जागा राष्ट्रवादीच लढवणार; शरद पवारांचे तयारीला लागण्याचे आवाहन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. येत्या आठ दिवसांत उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जळगावात शनिवारी स्पष्ट केले. रावेर मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांची बैठक जैन हिल्स येथे झाली. बैठकीला जिल्हाध्यक्ष गफ्फार मलिक, पालकमंत्री संजय सावकारे, खासदार ईश्वरलाल जैन उपस्थित होते. आपण आजपर्यंत कार्यकर्त्यांकडे कधीच काही मागितले नाही, परंतु या वेळी मला कार्यकर्त्यांकडून जळगावच्या दोन्ही मतदारसंघातून खासदार हवे आहेत, अशी भावनिक हाक देत शरद पवार यांनी पदाधिकार्‍यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

मोदी आणि आप दोन्हींचा प्रभाव उरला नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला अधिक फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न करण्याचे आवाहन पवारांनी केले. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार, माजी खासदार आणि आमदार, तालुकाध्यक्ष यांच्या उपस्थितीत आयोजित बैठकीला शरद पवारांनी संबोधित केले.

पीक विम्याचा प्रश्न मार्गी
केळी पीकविम्यासंदर्भात निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी समिती नियुक्त करण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल दिला असून सोमवारपर्यंत त्यावर निर्णय होऊ शकतो. या निर्णयामुळे अनेक केळी उत्पादक शेतकर्‍यांना लाभ होणार असल्याचेही ते म्हणाले.

दोन्ही जागा लढणार
रावेरच्या जागेवर पवार म्हणाले, दोन्ही जागा लढणार असल्याने चर्चेत वेळ न घालवता कामाला लागा. जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढणार आहे. मात्र, येथील उमेदवारीबाबत त्यांनी उत्सुकता कायम ठेवली आहे. पुढच्या आठवड्यात उमेदवार निश्चित करणार असल्याचे सांगत सोमवारी निर्णय घेण्याचे संकेतही त्यांनी या वेळी दिले.