आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टेट बँक चौकात डीपीचा अचानक स्फोट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शहरातील नंदिनीबाई विद्यालयासमोरील डीपीचा शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजता स्फोट झाला. त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल गळती होऊन तापलेल्या ऑइलने पेट घेतल्याने ही घटना घडली. त्यामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळीत झाली होती. याबाबत माहिती देऊनही क्रॉम्प्टनचे कर्मचारी घटनास्थळी उशिरा पोहोचल्याने वाहनचालकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
स्टेट बँक चौक परिसरात विजेचा दाब अचानक वाढल्याने केबल जळून धूर निघू लागला. केबल पूर्णपणे जळाल्यावर मोठा स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली. आग लागलेली असताना डीपीवरील वीजपुरवठा सुरू असल्याने कोणीही आग विझविण्याचे धाडस करीत नव्हते. त्यामुळे नागरिकांनी याबाबतची माहिती तत्काळ क्रॉम्प्टनला कळविली होती, तरीही संबंधित कर्मचारी उशिरा पोहोचले. त्याआधी अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी पेटत्या डीपीवर माती व वाळू टाकून आग विझविण्याचा प्रय} केला. स्फोट झाला त्यावेळी स्टेट बँक परिसरात ट्रॅव्हल्सच्या गाड्या उभ्या होत्या. प्रवाशांची व वाहनधारकांची मोठी गर्दी होती. त्यामुळे स्फोटानंतर डीपीजवळील वाहने तातडीने हलविण्यात आली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नसल्याचे क्रॉम्प्टनच्या कर्मचार्‍यांनी सांगितले. गेल्या दीड महिन्यात डीपी जळण्याची ही तिसरी घटना आहे. घटनेनंतर तासाभराने हा नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम करण्यात आल्य़्ाचे क्रॉम्प्टनचे शहर अभियंता चेतन मेहता यांनी सांगितले. यामुळे रात्री उशिरापर्यंत स्टेट बँक परिसर, शिवतीर्थ मैंदान, गांधीनगरसह बसस्थानक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.