आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Bank News In Marathi, ATM Card, Banking, Divya Marathi, Jalgaon

स्टेट बँकेचे 40 हजारांपर्यंतचे व्यवहार होणार पेपरलेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - ग्राहकांची गर्दी कमी होण्यासाठी आणि व्यवहार पेपरलेस होण्यासाठी दिवसभरात 40 हजारांपर्यंतचे व्यवहार एटीएम कार्डाद्वारे करण्याचे आदेश स्टेट बँकेच्या मुख्य शाखेने काढले आहेत. दोन दिवसांत या आदेशाची अंमलबजावणी होणार असून ग्राहकांना 24 तास या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.


यंत्रसामग्रीचा वापर करूनही बँकांमधील गर्दी कमी व्हायला तयार नाही. विशेषत: स्टेट बँकेत ग्राहकांची संख्या मोठी असल्याने रोज ग्राहकाचे भांडण होते. एकीकडे बँकांमध्ये पैसे काढण्यासोबत आता पैसे भरण्याची, पासबुक भरण्याची सुविधा एटीएम कार्डाद्वारे करून दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना रांगेत उभे राहण्याचीही आवश्यकता राहिलेली नाही. किमान 40 हजारांपर्यंतचे व्यवहार एटीएम कार्डाद्वारे करता येणार आहेत. त्यातही मोबाईल बँकिंगचा वापर केल्यास बँकेतही जाण्याची आवश्यकता नाही. मात्र, या सुविधेचा फारच कमी ग्राहक फायदा घेतात आणि ज्येष्ठांसह इतर ग्राहक बँकेत येऊन व्यवहार करतात. परिणामी, कोट्यवधी रुपये खचरूनही यंत्रणेचा वापर होत नसल्याची बाब रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आली आहे. यापुढे स्टेट बँकेतील व्यवहार एटीएम कार्डाद्वारे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.


केअर टेकरची सुविधा
जिल्हापेठ शाखेने दोन महिन्यांपूर्वी पेपरलेस कामकाज करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल उचलले आहे. त्यापाठोपाठ मुख्य शाखेनेही पुढाकार घेऊन ग्राहकांना 24 तास सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ग्राहकांना मार्गदर्शनासाठी येथे केअर टेकरची देखील व्यवस्था केली असल्याने आता सहजगत्या पैसे भरता येणार आहेत.


24 तास सुविधा
स्टेट बँकेने एटीएमसोबतच सीडीएम, जीएसएम उपलब्ध करून दिले आहे. यात बँक पासबुक भरणे, पैसे भरणे, मोबाइल रिचार्ज करणे, खात्यातून व्यवहार करणे या सुविधा बाहेर ठेवलेल्या मशीनवरून करता येणार आहे. त्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याची देखील आवश्यकता नाही. एटीएमसोबतच जीसीसी कार्डाचा देखील वापर येथे होणार आहे.


दोन दिवसांत अंमलबजावणी
मार्च एण्डमुळे या आदेशाची अंमलबजावणी करण्यास विलंब झाला. येत्या दोन दिवसांत ग्राहकांना 40 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार एटीएम कार्डाद्वारे करण्याची सक्ती केली जाईल. याबाबत बँकेत फलक लावले असून येणार्‍या प्रत्येक ग्राहकाला मशीनद्वारे व्यवहार करण्यास सांगू. प्रदीप टंडन, मुख्य प्रबंधक, स्टेट बँक