आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Carom Championship In Ayesha Mohammad Gold Medal

राज्यस्तरीय मानांकन कॅरम स्पर्धेत आयशा मोहंमदने पटकावले सुवर्ण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबईयेथे झालेल्या राज्यस्तरीय खुल्या मानांकन कॅरम स्पर्धेत जैन इरिगेशनची आयशा मोहंमद हिने सलग दुसऱ्या वर्षी विजेती राहून सुवर्णपदक पटकावले.

आयशाने उपउपांत्यपूर्व फेरीत संगीता चांदोरकर हिचा, उपांत्यपूर्वमध्ये अनुपमा केदार, उपांत्य फेरीत शैला जाधव यांचा पराभव करून अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात शिल्पा पालनिटकर हिचा पराभव करून पाचवी चेअरमन ट्रॉफी मिळवून विजेतेपद मिळवले.
तिने या चारही सामन्यांत सरळ २-० ने पराभव केला. तिच्या यशाबद्दल जैन अकॅडमीचे अध्यक्ष अशोक जैन, अतुल जैन, क्रीडा समन्वयक फारुख शेख, राष्ट्रीय खेळाडू सय्यद मोहसीन खान, वसीम शेख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.