आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Deputy Minister Ajit Pawar In Jalagaon For Mahapalika Election

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अजित पवारांचा ‘मिशन दिल्ली’चा नारा; कुठे जांभया तर कुठे डुलक्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- महापालिकेच्या 75 जागांसाठी रविवारी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचारतोफा 30 रोजी थंडावणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजेपासून जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचे शुक्रवारचे शेड्युल टाइट झाले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांच्या संपर्कात राहण्यासाठी शक्तिप्रदर्शनाचा मार्ग पत्करण्यात येणार आहे. साडे अकरा तासांचा उपयोग जाहीररीत्या कसा करता येईल, यावर गुरुवारी सगळ्याच उमेद्वारांकडून विचारविनीमय सुरू होता.

उमेदवारांना प्रचारासाठी तब्बल 14 दिवसांचा कालावधी मिळाल्याने तीन ते चारवेळा ‘होम टू होम’ प्रचाराची संधी उपलब्ध झाली आहे. निवडणूक आयोगाच्या निकषानुसार मतदानापूर्वी एक दिवस अगोदर प्रचार बंद करावा लागणार असून आता उमेदवारांच्या हातात शुक्रवारचा दिवस आहे. त्यामुळे वेळेचा सदुपयोग कसा करता येईल, यासाठी सर्वच उमेदवारांची धडपड सुरू आहे. त्यादृष्टिकोनातून प्रत्येक उमेदवाराने मिनिट-टू-मिनिट नियोजन केले आहे.

सभेत अजित पवारांचा ‘मिशन दिल्ली’चा नारा
पिंप्राळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारांना दोन खासदार देण्याची मागणी करत ‘मिशन दिल्ली’ची साद घातली. तसेच उकिरडा कितीही उकरला तरी घाणच निघणार असल्याने आज मुद्दाम कोणावरही टीका करणार नाही; परंतु सत्ता आल्यास नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी-चिंचवड पालिकेच्या धर्तीवर जळगावचा विकास करण्याचे आश्वासन दिले. या वेळी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी चौफेर फटकेबाजी केली.

काय म्हणाले उपमुख्यमंत्री?
0 जळगावच्या नागरिकांच्या सहनशीलतेला सलाम करावासा वाटतो. पुणे, बारामतीमध्ये जळगावसारखी स्थिती असती, तर अजित पवारला लोकांनी रस्त्यावर फिरू दिले नसते.
0 जळगाव हे सेक्स कॅँडल, भ्रष्टाचार, पालिकेचे कर्ज व बुडालेल्या पतसंस्था यासाठी प्रसिद्ध आहे. पैसे घेणार्‍या खासदारांपर्यंत ठीक होते; पण चक्क सट्टेवाल्याला महापौर केल्याने जळगावची पार इज्जतच गेली.
0 कुणाची उणीदुणी काढण्यात काही अर्थ नाही, असे ठरवून जळगावला आलो होतो. झाले ते जाऊ द्या, दोष देत बसू नका; आता विकासाकडे जाऊ.
0 जळगावच्या विकासासाठी येथील जनतेची मानसिकता विकासात्मक होणे आवश्यक आहे. ती बदलली पाहिजे.

सभेची औपचारिकता झाली कंटाळवाणी

तर सर्वसामान्यांचे काय ?
कंटाळा जातो अन् उत्साह येतो तो नावीन्यातून. उपमुख्यमंत्र्यांच्याच सभेत भरलेला हा कंटाळा म्हणजे नेत्यांनी नावीन्य आणि कल्पकता हरवली असल्याचेच द्योतक नव्हते का? नेत्यांची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचे काय? ते मतदान करताना कंटाळणार नाहीत, असे कसे म्हणणार?

जांभया आणि डुलक्या
निवडणूक प्रचारासाठी शहारात आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाची उत्सुकता र्शोत्यांना होती; पण त्यांच्या आधी भाषण करणार्‍यांची ‘कॅसेट’ इतकी चालली की, मंचावर बसलेले सारे ‘नेते’ही पार कंटाळून गेले होते. त्यामुळे त्यांच्यात जांभया आणि डुलक्यांची स्पर्धाच सुरू होती.

घरकुलप्रकरणी 4ला सुनावणी
घरकुलप्रकरणी गुरुवारी बचावपक्षाच्या वकिलांनी सरकारपक्षाला दोषारोप सादर करताना दिलेल्या दस्ताऐवजात जी कागदपत्रे मिळाली नव्हती त्यांची यादी न्यायालयात सादर केली. गुरुवारी खटल्याचे कामकाज झाले नाही. याप्रकरणी आता 4 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे. आमदार सुरेश जैन यांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जळगाव कारागृहात रवानगी करावी, असा अर्ज दिला आहे.

सानियाप्रकरणी 2ला निकाल
गोळीबारप्रकरणी अटकेत असलेल्या सानिया कादरी यांच्या खटल्याचा निकाल 2 सप्टेंबर रोजी देण्यात येणार आहे. हा निकाल गुरुवारीच देण्यात येणार होता. त्यानुसार गुरुवारी खटल्यातील आठही संशयित आरोपींना न्यायाधीश डी.पी.सुराणा यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.