आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढाेलकी वादनाने नाट्य स्पर्धेचा बिगुल वाजला, रसिकांना नाटकांची मेजवानी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव; अप्पर जिल्हाधिकारी गुलाबराव खरात यांनी ढाेलकीच्या तालावर थाप देत अागळ्या-वेगळ्या पद्धतीने राज्य नाट्य स्पर्धेचे उद्घाटन केले. महाराष्ट्र सांस्कृतिक कार्य संचालनालय अायाेजित राज्य हाैशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी सुरुवात झाली.
जेडीसीसी बँकेच्या सभागृहात १९ नाेव्हेंबर ते डिसेंबरदरम्यान ही स्पर्धा हाेणार अाहे. जवळपास १९ नाटकांचे सादरीकरण हाेणार असून जळगावकर रसिकांना यानिमित्ताने नाटकांची मेजवानी मिळणार अाहे.

उद््घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अामदार सुरेश भाेळे, नाट्य परिषदेचे जळगावचे श्रीपाद जाेशी, मुंबई येथील परीक्षक दिनानाथ घारपुरे, नागपूरचे देवेंद्र बाेंदरे, अाैरंगाबादचे डाॅ.घईनाथ वळेकर उपस्थित हाेते.

याप्रसंगी आमदार भाेळे म्हणाले, रसिक अालेत तर कलावंतांना महत्त्व असते. परंतु, अाजकाल रसिकांचा अाेढा हा सिनेमांकडेच जास्त असून नाटकाकडे कमी अाहे. तरुणाईदेखील नाटक पाहायला लवकर तयार हाेत नाही. पण संस्कृती टिकवण्यासाठी नाटक हे महत्त्वाचे माध्यम अाहे.
अापल्यातील कला दाखवण्याचे उत्तम साधन हा रंगमंच अाहे.नाट्यगृहाअभावी अनेक अडचणी कलाकारांना येत असून शासनस्तरावर त्याचे प्रयत्न सुरू अाहेत. लवकरच नवीन माेठे नाट्यगृह तयार हाेणार अाहे. त्यामुळे नाटकाकडे प्रेक्षकांनी वळावे, असेही ते म्हणाले. तसेच गुलाबराव खरात म्हणाले, अाजकाल कलाप्रकाराकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. अनेक ठिकाणी कलावंतांना दुय्यम स्थान दिले जाते. मात्र, आपली कला सादर करायला त्याला खूप मेहनत करावी लागते. कष्ट करून ताे कला सादर करीत असताे. त्यामुळे त्यांना सन्मान द्यायला हवा. तमाशा, भारुड, अभंग यांचेही जतन करायला हवे.

स्पर्धेचे जळगाव केंद्राचे समन्वयक िवनाेद ढगे यांनी प्रास्ताविक केले. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले.

ढाेलकीवादक झालाे असताे...
यावेळी खरात म्हणाले की, जर मी अप्पर जिल्हाधिकारी झालो नसताे, तर कलाकार झालाे असताे, अशी भावना व्यक्त करीत तमाशाचा ढाेलकीवादक झालाे असताे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे प्रेक्षकांच्या अाग्रहास्तव ढाेलकीवादन करीत उपस्थितांची दाद मिळवली. उत्कृष्ट ढाेलकी वादनाचा तुकडा त्यांनी सादर करीत प्रशासनात कार्यरत असतानाही कलावंत अजूनही जिवंत असल्याचे दर्शन या वेळी त्यांनी ढाेलकी वादनाने घडवून दिले.