आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब रंगले फुटबॉलमध्ये, ‘लेकीं’च्या फुटबॉल संघात खेळणारी आई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- दोन भाऊ अथवा दोन बहिणी एकाच संघात खेळताना आपण पाहिले-एेकले आहे, पण दोन मुली आणि त्यांची आई चक्क एकाच संघात खेळतात. तोही खेळ म्हणजे पुरुषी वर्चस्वाचा, दांडगाईचा. अर्थात फुटबॉल,असे सांगितल्यास आश्चर्य वाटेल.
पण जळगावात सुरू असलेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत पुण्याच्या ३८ वर्षीय मेव्हिस अॅडम आपल्या लेकींसमवेत मैदानात उतरलेल्या आहेत. खेळाडू,प्रशिक्षक आणि व्यवस्थापक, अशी तिहेरी भूमिका त्या पेलत आहेत. अाई ही मुलांच्या संगाेपनासाठी अापले संपूर्ण अायुष्य पणाला लावते. पण अापली अावड सांभाळत मुलींनाही प्राेत्साहन देण्यासाठी त्यांच्या बराेबरीने फुटबाॅल खेळणे हे विशेषच म्हणावे लागेल. मेव्हिस यांना चार अपत्ये. तीन मुली आणि एक मुलगा. तरीही त्यांचा उत्साह,चपळाई वाखाणण्यासारखी आहे.
डावीकडून मर्लन, मुलगी अॅडेलसह मेव्हिस आणि म्युरियल विप्रो कंपनीत काम करणाऱ्या मेव्हिस अॅडम यांचे माहेर भुसावळचे. त्यांचे पती अाॅल्व्हिन हे सुध्दा फुटबाॅलपटू अाहेत. दाेन मुली झाल्यानंतर पतीच्या प्राेत्साहनामुळे त्या अाठ वर्षांपूर्वी फुटबाॅल खेळायला लागल्या. त्यांना १९ वर्षांची मर्लन, १७ वर्षांची म्युरियल पावणेदाेन वर्षांची अॅडेल, अशा तीन मुली ११ वर्षांचा अायमार नावाचा मुलगा अाहे. मर्लन, म्युरियल या दाेघींसाेबतच त्या पुण्याच्या फुटबाॅल संघात खेळतात. तर धाकटी अॅडेल ही फक्त अाईचा खेळ अानंदाने पाहतेय. मुलगाही १२ वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात आहे.
नियमित व्यायाम : मेव्हिसदरराेज नियमितपणे व्यायाम करतात. तसेच त्या ४५ मिनिटे फुटबाॅलचा सरावही करतात. त्यांनी डीएगाे ज्युनियर्स नावाची अकॅडमी काढली अाहे. यात त्यांनी स्वत:च्या मुलींसाेबत अनेकांना फुटबाॅल शिकवले.
इच्छाशक्ती असल्यास सगळे काही शक्य
मुलगाझाल्यावर महिन्यांनंतर मेव्हिस लगेच खेळायला लागल्या. चौथी मुलगी झाल्यानंतर अापण खेळूच शकणार नाही, असे त्यांना वाटत हाेते. कारण संघात त्यांच्यापेक्षा खूपच लहान मुली हाेत्या. त्यांचा खेळण्याचा वेग मेव्हिस यांचा वेग, स्टॅमिना यात खूप तफावत हाेती. तरीदेखील त्या डगमगल्या नाहीत. मनात इच्छाशक्ती असली तर सगळं काही शक्य आहे, असे त्या अावर्जून सांगतात.

;