आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात तिघांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार घोषित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - जिल्ह्यातील तिघा प्राथमिक शिक्षकांची राज्य शासनाच्या आदर्श पुरस्कारासाठी निवड झाली आहे. यात एरंडोल तालुक्यातील खेडी खुर्दचे जि.प. शिक्षक सुनील पीतांबर पाटील शिरसोली येथील बारी विद्यालयाचे उपशिक्षक रामकृष्ण काशीराम पाटील तर आदिवासी भागातून वैजापूर येथील शिक्षक गुरुदत्त गोंविद निंबाळे रा. सानेनगर, चोपडा यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुरस्कार दिला जाणार आहे. शिक्षक सुनील पाटील यांनी शाळा आयएसओ, डिजिटलसाठी निधी जमवला आहे. उपशिक्षक रामकृष्ण पाटील यांनी विविध शैक्षणिक उपक्रमात भरीव योगदान देत तंत्रस्नेही उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख आहे.
जि. प. च्या १२ शिक्षकांना आदर्श शिक्षक तर, शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार
शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषदेतर्फे रविवारी जिल्ह्यातील १२ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. तर शाळांची स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारांचे वितरण सोमवार दि. रोजी सकाळी १२.३० वाजता शहरातील कांताई सभागृहात करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारांवर शिक्षक संघटनांनी बहिष्कार टाकल्याने पुरस्कारासाठी प्रस्तावांची संख्या घटली होती.

यंदा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी जिल्हाभरातून पुरेसे प्रस्ताव प्राप्त झाल्याने प्रशासनाने उर्दू माध्यमांच्या पुरस्काराची संख्या यावर्षी वाढवली आहे. या वेळी उर्दू शिक्षकांना जिल्हा पुरस्कार दिले जाणार आहेत. यासह मुख्याध्यापकांचा यात समावेश आहे. या वेळी जिल्ह्यातील ग्रीन श्रेणीतील शाळांना स्वच्छ विद्यालय पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासह शाळांना गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत गौरवण्यात येणार आहे. प्रस्ताव दाखल करणाऱ्या शिक्षकांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, कार्यानुभव यांची दखल घेऊन पुरस्कारांसाठी निवड केली आहे. सोमवारी या पुरस्कारांचे वितरण होणार आहे.
यांना मिळाला पुरस्कार
प्रतिभाकाशिनाथ पाटील (भडगाव), जनार्दन गोविंदा जाधव (कंडारी, ता. भुसावळ), समीना बेगम शे.बशीर (उर्दू शाळा, बोदवड), रवींद्र नवल मनोरे (सुटकार, ता. चोपडा), सय्यद हुस्नोद्दीन निजामुद्दीन (उर्दू पिंपरखेड, ता. चाळीसगाव), दिलीप शंकर कोळी ( फुलेनगर पाळधी, ता. धरणगाव), नितीन वसंतराव बोरसे (पिंप्रा बु. एऱंडोल), शब्बीर खान बुले खान (उर्दू शेंदुणी, ता. जामनेर), मनोहर बाबुराव सोनवणे (मोंढाळे, ता. पाचोरा), सैफुल्ला खान दिलदार खान (उर्दू शाळा , मुक्ताईनगर), शे. मोहंमद शे. करीम पिंजारी (उर्दू शाळा, न्हावी, ता.यावल).
स्वच्छ विद्यालय पुरस्कारप्राप्त जि.प.शाळा
झुरखेडा(ता.धरणगाव), यशवंतनगर (ता. भडगाव), उन्नतीनगर (ता. जामनेर), पिंगळवाडे (ता.अमळनेर), जैतपीर (ता. अमळनेर), नरवेल (ता.मुक्ताईनगर), धामणदे (ता. मुक्ताईनगर).
गुणवत्ता विकास गौरवप्राप्त शाळा
पिंगळवाडे (ता. अमळनेर), भराडी (ता.जामनेर), शेलवड (ता. बोदवड), सावखेडा खु. (ता. जळगाव), कोथळी (ता. मुक्ताईनगर), यशवंतनगर (भडगाव), नरवेल (मुक्ताईनगर).
बातम्या आणखी आहेत...