आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • State Government Officials,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मचार्‍यांनो, संपत्ती जमवा; पण सावधान!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- राज्य सरकारी अधिकारी व कर्मचार्‍यांना दर पाच वर्षांनी सादर करावी लागणारी मालमत्ता व संपत्तीची माहिती आता दरवर्षी द्यावी लागणार आहे. यात कुचराई करणार्‍या अधिकार्‍यांवर शिस्तभंगाची कारवाई तर होईलच, सोबत पदोन्नतीच्या लाभापासूनदेखील त्यांना वंचित राहावे लागेल. राज्य सरकारच्या कोणत्याही शासकीय कार्यालयात नोकरीला लागल्यानंतर संबंधित कर्मचार्‍यांना प्रथम सेवा प्रवेशाच्या वेळी दोन महिन्यांच्या आत स्वत:ची मालमत्ता व दायित्वसंबंधी माहिती शासनाकडे सादर करावी लागत होती; परंतु आता मालमत्तेशी व कर्जाशी निगडित माहिती तीन प्रकारच्या स्वरूपात दरवर्षी द्यावी लागणार आहे. 31 मार्चपर्यंतच्या माहितीचा यात समावेश असणार आहे. गोपनीय असलेली माहिती सीलबंद पाकिटात यंदा 30 जूनपर्यंत कार्यालय प्रमु्ख व विभाग प्रमुखांकडे सादर करावी लागणार असून पुढच्या वर्षापासून 31 मे ही अंतिम मुदत देण्यात आली आहे.
अन्यथा ठरू शकते अडचणीचे
मालमत्तेसंदर्भातील विवरण दिलेल्या कालावधीत ते सादर न केल्यास ती गैरवर्तणूक मानण्यात येणार आहे. शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच शासनातील सर्व टप्प्यांवरील पदोन्नती, आश्वासित योजनेंतर्गत पदोन्नती, प्रतिनियुक्ती, विदेश दौरा यासाठी परवानगी अथवा आदेश देण्यापूर्वी मालमत्तेचे विवरण सादर केल्याची खात्री केली जाणार आहे. माहिती न करणार्‍यांना पदोन्नतीही दिली जाणार नाही.
संपत्तीची होईल सखोल चौकशी
एखाद्या विशिष्ट प्रकरणात शासकीय कर्मचार्‍याची सचोटी संशयास्पद वाटल्यास किंवा त्याच्या असलेल्या उत्पन्नाचा विचार करता बेहिशेबी मालमत्ता साठवल्याची खात्री झाल्यास त्याचे विवरण पत्राची छाननी केव्हाही होऊ शकते. तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत सखोल चौकशीसुद्धा केली जाऊ शकते.
कर्जाचीही माहिती द्यावी लागणार
कर्मचार्‍याकडील सर्व रोख रक्कम, बॅँक खाती, ठेव खाती, मुदतबंद ठेवी, भविष्यनिर्वाह निधी खाती, पोस्ट ऑफिस बचत खाती, शेअर्स, कर्ज यासारख्या ठेवींच्या रकमा तसेच सोने चांदीचे दागिने, वाहनांची माहिती, घरातील रोजच्या वापरातील कपडे, भांडी, पुस्तके, काच सामान, टीव्ही, फ्रीज, एसी या वस्तूंची माहिती भरावी लागणार आहे.