आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इनडोअर हॉकी चाचणीसाठी ‘जैन’चे १६ खेळाडू रवाना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(निवड चाचणीसाठी पात्र झालेल्या खेळाडूंसमवेत अ.मोहसीन, फारूख शेख, अॅड. सुधीर कुलकर्णी, प्रा.डॉ. अनिता कोल्हे, शादाब अख्तर)
जळगाव- नाशिक येथे १७ वर्षांखालील मुले, मुली आणि फेडरेशन कप पुरुष महिला राष्ट्रीय इनडोअर हॉकी स्पर्धेचे २० ते २३ जूनदरम्यान आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य इनडोअर हॉकी संघाची निवड चाचणी नाशिक येथे होत आहे. त्यासाठी जैन स्पोर्ट्सचे महिला ११ पुरुष खेळाडूंची निवड करण्यात आली असून ते सोमवारी रवाना झाले. त्यांना महाराष्ट्र इनडोअर हॉकीचे उपाध्यक्ष फारुख शेख यांच्या हस्ते क्रीडा साहित्य देऊन निरोप देण्यात आला. या वेळी जळगाव जिल्हा इनडोअर संघटनेचे सहसचिव अॅड. सुधीर कुलकर्णी, खजिनदार प्रा.डॉ. अनिता कोल्हे, प्रशिक्षक शादाब सय्यद व्यवस्थापक मोहसीन उपस्थित होते.
निवड झालेले खेळाडू : महिला- अश्विनीधनगर, पूजा मोहोळकर, कोमल सोनवणे, माधुरी बेहेरे, पूनम पाटील. पुरुष- गीतेशचौधरी, सागर लाड, महेंद्र चखाले, इकबाल पिंजारी, मुजफ्फर शेख, सत्यनारायण पवार, राहुल धुळानंकर, शादाब अख्तर, आमिर खान, इरफान अली, चेतन नेरकर, नूर पटेल.