आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Level Competition Aavishkar Interrogated By Dr. Narendra Jadhav

उत्‍तर महाराष्‍ट्र विद्यापीठ,जळगाव येथे आविष्‍कार स्‍पर्धेचे, डॉ. नरेंद्र जाधव यांच्‍या हस्‍ते थाटात उदघाटन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सामाजिक, आर्थिक विकास ही संशोधनाची व्याख्या आहे. यासाठी शिक्षण आणि कौशल्य विकासावर भर दिला गेला पाहिजे. भारताने जागतिक महासत्तेकडे वाटचाल केली आहे. त्यासाठी अधिक चांगल्या प्रकारचे संशोधन करून देशाच्या प्रगतीत भर घालण्याचे कामही विद्यार्थ्यांना करावे लागणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक वृत्ती वाढवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांनी केले.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील राज्यस्तरीय आविष्कार स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कुलसचिव प्रा. ए.एम.महाजन, परीक्षा नियंत्रक डॉ. डी.एन.गुजराथी, प्रा. डी.जी.हुंडीवाले, डॉ. व्ही.बी.गायकवाड (पुणे), एस.ए.शेटे (दापोली), प्रा.डॉ. व्ही.एन.माहेश्वरी, प्रा.डॉ. गौरी राणे, प्रा.डॉ. पी.आर.चौधरी, डॉ. इकबाल शाह, डॉ. आसाराम पैठणे, डॉ. पंकजकुमार नन्नवरे, मयूरेश कोल्हे, उपस्थित होते. पदवीप्रदान सभागृहात पोस्टर एक्झिबिशनला शुक्रवारी सुरुवात होणार आहे. अविष्कार ठरणार मार्गदर्शक

कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम म्हणाले की, रौप्य महोत्सवी वर्षात विद्यार्थी हिताच्या दृष्टीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. संशोधन हे प्रयोगशाळेपर्यंत र्मयादेत न ठेवता ग्रामीण, आदिवासी भागापर्यंत ते कसे पोहचेल हे पाहिले पाहिजे. रूपयाचे अवमुल्यन होणार नाही यासाठी रूपया मजबूत करण्याचे आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. आशुतोष पाटील, डॉ. प्रीती अग्रवाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तर आभार प्रा.डॉ. हुंडीवाले यांनी मानले.

शेतीत गुंतवणूक अल्प
केंद्रीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उप महासंचालक डॉ. एच.पी.सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था प्रगत असली तरी, ती टिकवून ठेवण्याची गरज आहे. यासाठी विविध संशोधनात्मक प्रयोग झाले पाहिजेत. देशात शेतीतील गुंतवणूक फार कमी आहे; ती सोने व घर यातच अधिक केली जाते. संशोधनात्मक विकास ही काळाची गरज बनली असून ही स्थिती बदलवण्यासाठी आविष्कार सारख्या स्पर्धांच्या माध्यमातून संशोधनवृत्ती विकसित केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. डॉ. कार्लाेस गोन्झालीन (मेक्सिको) यांनीही युवकांना स्पर्धेच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचे सोने करावे व नवनवीन प्रयोग यशस्वी करून आपले कौशल्य विकसित करावे, असे त्यांनी सांगितले.

भारत संशोधनात मागे
नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर जीडीपीच्या दरात काही वर्षांत घट झाली आहे. जगाच्या इतर देशांच्या तुलनेत भारतात तरुणांची संख्या अधिक असल्यामुळे त्याचा फायदा देशाला होणार आहे. मागील 36 वर्षांत या दरात तीन टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली नव्हती; मात्र सन 1991मध्ये केलेल्या आर्थिक धोरणातील बदलांचा फायदा झाला. संशोधनात सर्व देश प्रगती करत आहेत. जगातील दोनशे देशांत भारत फारच मागे आहे. आर्थिक प्रगतीचा दर पुढील दोन वर्षात ढासळू शकतो, असा विश्वासही डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केला.