आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धात कोल्हापूरचा भोई अव्वल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जिल्हा अँथलेटिक्स असोसिएशनतर्फे बबनभाऊ बाहेती स्मृतिप्रीत्यर्थ जळगावात बुधवारी, 1 ऑगस्ट रोजी झालेल्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत कोल्हापूरचा परशुराम भोई याने 21 किलोमीटरचे अंतर 2 तास 54 मिनिटांत पूर्ण करत अव्वल क्रमांक पटकावला. सातार्‍याचा कालिदास हिरवे व स्वप्निल सावंत यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. शालेय गटातील जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलांमध्ये तामसवाडीचा वैभव माळी, तर मुलींमध्ये चौबे कन्याशाळेची वर्षा मोरे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
ख्वाजामियां चौकातून स्पर्धेला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिलीप खोडपे, महापौर विष्णू भंगाळे, राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस मोहन भावसार यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली. नगरसेवक प्रा. चंद्रकांत सोनवणे, नितीन बरडे, मनोज चौधरी, श्याम कोगटा, बाजार समितीचे शशी बियाणी, सेंट्र बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक विजय मुरार, उज्‍जवला बाहेती, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण भोसले, शिवाजीराव शिंपी, पांडुरंग खडके, राज्य अँथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. नारायण खडके प्रमुख पाहुणे होते. जिल्हा अँथलेटिक्स संघटनेचे सचिव राजेश जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रोहन बाहेती यांनी प्रास्ताविक केले.
पारितोषिक वितरण - अँड. बबनभाऊ बाहेती महाविद्यालयात स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले. प्राचार्य बी. एम. भारंबे, जिल्हा क्रीडाधिकारी सुभाष रेवतकर, चंद्रकांत वांद्रे, राज्य कबड्डी संघटनेचे सचिव मोहन भावसार, बन्सी माळी आदी उपस्थित होते. प्रवीण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. मनोज वाघ यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. पंचप्रमुख प्रा. इकबाल मिर्झा, नीलेश पाटील, किशोर पाटील, प्रा. पी. आर. चौधरी, प्रा. किरण नेहेते, प्रा. हाजी ताजोद्दीन शेख पंच होते. प्रवीण पाटील, उल्हास ठाकरे, डी. व्ही. चौधरी, प्रा. चाँद खान, प्रा. हसीन तडवी, दिनेश माळी, ए. एस. ठाकरे, उत्तम चिंचाळे, गिरीश महाजन, सचिन महाजन, योगेश सोनवणे, अमर येवले आदींनी सहकार्य केले.
जिल्हास्तरीय शालेय स्पर्धा
मुले : 1) वैभव माळी, ना. शि. मंडळ, तासवाडी (16:12), 2) योगेश मनोरे, एनएसएच, पारोळा (16:18), 3) गणेश कोळी (16:20), 4) दीपक कोळी नूतन माध्यमिक विद्यालय, चुंचाळे (17:23), 5) मुकेश पाटील, ए. टी. झांबरे विद्यालय (17:40), 6) अजय सपकाळे, सपकाळे विद्यालय, धामणगाव (17:40), 7) अंकित कोळी, पी. एम. मुंदडे विद्यालय (18:25), 8) रितेश सूर्यवंशी, पी. एस. पाटील विद्यालय, नांद्रे (18:30), 9) स्वप्नील पाटील, एस. आर. विद्यालय, मानलदे (19:20), 10) बबलू हिवराळे, जिजामाता विद्यालय (19:23), 11) महेंद्र सपकाळे, 12) अमर सपकाळे, धामणगाव.
मुली : 1) वर्षा मोरे, चौबे शाळा (19:16), 2) किरण मराठे इंदिरा गांधी विद्यालय, धरणगाव (21:24), 3) योगिता सपकाळे (22:09), 4) पूजा अलकरी (22:25), 5) विनिता सूर्यवंशी (22:40), 6) योगिता कोळी, चौबे शाळा (22:52), 7) अर्चना मोरे, वासू सपकाळे विद्यालय (23:26), 8) तेर्जशी चौधरी, चौबे शाळा (23:30), 9) सोनाली सपकाळे, वासू सपकाळे विद्यालय (24:40), 10) कल्याणी कछवा, भगीरथ हायस्कूल (24:50)
अमरावतीच्या खेळाडूंची चीटिंग

जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत शालेय गटातील मुलांच्या स्पर्धेत अमरावतीच्या दोन खेळाडूंनी दुसर्‍या खेळाडूंच्या नावावर स्पर्धेत सहभाग नोंदवला. बक्षिसाची रक्कम वाटून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, फिनिशिंग लाइनवर उभ्या असलेल्या पंचांना मुले अनोळखी वाटल्यानंतर त्यांनी या स्पर्धकांना तातडीने बाहेर काढले.