आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसटी महामंडळाच्या बसेसना सुरत स्थानकात होतो मज्जाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सुरत बसस्थानकात एसटी महामंडळाच्या बसेसना कायम प्रतीक्षा करावी लागते.
नवापूर - गुजरात राज्यातील सुरत शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्रातील काही परवानाधारक बसेसना प्रवेश दिला जात नसल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. यात लहान मुले, महिला, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागत आहे. गुजरात राज्यात रोजगारानिमित्त लाखोंच्या संख्येत गेलेल्या खान्देश, मराठवाडा, विदर्भातील नागरिकांना गुजरात राज्यातील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे भर उन्हाळयात त्रास सहन करावा लागत आहे. सुरत शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावर महाराष्ट्रातील काही परवानाधारक बसेसना स्थानकात प्रवेश दिला जात नसल्याने तीनशे मीटर लांब प्रवाशांना उतरवण्यात येते. शहरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. भर रस्त्यात बस उभी केल्याने रहदारीला अडथळा निर्माण होताे. रस्ता ओलांडताना प्रवाशांना अपघात होऊ शकतो. २०० मीटर अंतरावरील बसस्थानकात जाण्यासाठी १० रुपये भाडे खर्च करून रिक्षा करावी लागते. उन्हाळा लग्नसराईत प्रवाशांचे हाल होत आहेत.
यासंदर्भात गुजरात राज्यातील सुरत बसस्थानकातील आगारप्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सुरत मध्यवर्ती स्थानकाचे नवनिर्माण करण्याचे काम चालू आहे. जागा पुरेशी नसल्याने विनापरवानाधारक बसेसना विरोध केला जातो. महाराष्ट्रातील काही बसेसमुळे गुजरात राज्याचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही विरोध करतो. त्यासाठी महाराष्ट्र गुजरात राज्यातील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने बैठक घेऊन उपाययोजना करणे गरजेचे आहे.

धुळे : धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या ६८ बस
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ४६ बस
नाशिक : बस
औरंगाबाद : बस
मराठवाडा : बस
विदर्भ : बस
एकूण १४२ बसेस नवापूर मार्गे रवाना

आंतरराज्य बस परवाना पद्धत
मार्च-एप्रिलमहिन्यात आंतरराज्य बसेसना परवाना देण्यात येतो. महाराष्ट्रातील बसेससाठी मुंबईहून परवाने दिले जातात. तर गुजरात राज्यातील बसेसना अहमदाबादहून परिवहन विभागाकडून समप्रमाणात परवाने देण्यात येतात. गुजरात राज्यातील बस महाराष्ट्रात २०० किलोमीटर अंतराचा प्रवास करीत असेल तर तेवढ्याच अंतराचा प्रवास महाराष्ट्रातील बस गुजरात राज्यात प्रवास करते. बसेसच्या संख्याही समप्रमाणात असतात. त्यासाठी दोन्ही राज्यांना अटी शर्ती असतात.

परवानाधारक बसला बंदी
नवापूरआगारातील सर्व पाच बसेसना सुरत मध्यवर्ती स्थानकावर जाण्याचे परवाने देण्यात आले आहे. तरी नवापूर-सुरत बसला सुरत शहरातील बसस्थानकात प्रवेश दिला जात नाही. गुजरातमधील सुरत बसस्थानक प्रशासन प्रांतवाद करीत आहे. त्यामुळे सर्वसाधारण प्रवाशांना परिणाम भोगावा लागत आहे. लग्नसराईसाठी नवापूर-उधना दोन जादा बस सोडण्यात येणार आहेत. बऱ्याच डेपोतून लग्नसराईत अतिरिक्त बसेस सोडण्यात येत आहेत. नवापूर-सुरत बसमधून एका दिवसाला सीझनमध्ये दहा, बारा हजार रुपयांची आवक हाेते; परंतु गुजरात राज्यात बस प्रवासी भरण्यास विरोध केल्यास आवक चार ते पाच हजारांवर येत असल्याने माेठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

कायम दाखविली जातात कारणे
गुजरात राज्यातील सुरत येथे नवापूरच्या परवानाधारक बसेस मध्यवर्ती स्थानकात लावण्यात नेहमी काहीतरी कारण दाखवून मज्जाव केला जातो. नवापूरला गेल्या रविवारी गुजरात डेपोची नवापूर-सुरत बस विनापरवाना रवाना करण्यात आली होती. त्या वेळी बस जमा करून डेपोत लावली असता गुजरातच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले होते. यापुढे नवापूरच्या बसला अडवण्यात येणार नाही, अशी माहिती सुरतचे आगार व्यवस्थापकांनी व्हॉट‌्सअॅपद्वारे दिली. अनुराधाचौरे, एसटी आगार व्यवस्थापक,नवापूर.

महाराष्ट्रातील बसस्थानकावर प्रांतवाद करता सर्वांना चांगली वागणूक दिली जाते; परंतु सुरत बसस्थानकात भेदभाव केला जातो. बसेस वेळेवर लावत नसल्याने तोपर्यंत महाराष्ट्र बसदेखील भरू देत नाही. बसलेले प्रवासीही काही वेळा खाली उतरून दिले जातात. व्ही.एस. गावित, सहा. वाहतूक अधीक्षक,नवापूर.
बातम्या आणखी आहेत...