आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परिवहन महामंडळाच्या स्मार्टकार्ड योजनेचा उडाला बोजवारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ - राज्य परिवहन महामंडळाने विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणा-यांसाठी पासऐवजी स्मार्टकार्ड योजना हाती घेतली. मात्र, मंदगतीच्या कारभारामुळे या योजनेची वेळेवर अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. भुसावळ आगाराला आवश्यक असलेल्या तीन हजारपैकी केवळ 800 स्मार्टकार्ड उपलब्ध झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
परिवहन महामंडळाने इतर शासकीय कार्यालयांप्रमाणे नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. त्यानुसार शालेय विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवास करणा-या विविध क्षेत्रातील चाकरमान्यांना देण्यात येणारा मासिक पास बंद करून स्मार्टकार्ड देणे सुरू केले. पासधारकांना मासिक शुल्काव्यतिरिक्त तीन वर्षांच्या कालावधीसाठी अवघ्या 30 रुपयांत स्मार्टकार्ड मिळते. मात्र, या स्मार्टकार्डचे दरमहा नूतनीकरण करावे लागते.

दरम्यान, ज्या गावात पाचवीपुढील शिक्षणाची व्यवस्था नसेल, तेथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासासाठी स्मार्टकार्ड वितरणात प्राधान्य मिळते. अशा गावातील विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत मोफत स्मार्टकार्ड मिळते. हे स्मार्टकार्ड एटीएमसारखे सहज खिशात अथवा पर्समध्ये ठेवले जात असल्याने अनेकांची त्याला पसंती मिळते. मात्र, भुसावळ येथील बसस्थानकावर तीन हजार स्मार्टकार्डची आवश्यकता असताना केवळ 800 कार्ड वितरित करण्यात आले आहेत.

700 विद्यार्थिनी
अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत पाचवी ते दहावीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत स्मार्टकार्ड योजना राबवण्यात येते. तालुक्यातील सुमारे 700 विद्यार्थिनी या योजनेचा लाभ घेतात. मात्र, बसस्थानकावर स्मार्टकार्डचा तुटवडा असल्याने विद्यार्थिनींना जास्तीचे भाडे खर्च करून भुसावळ शहरातील शाळांमध्ये जावे लागते.
- परिवहन महामंडळाने तोट्यातून बाहेर पडण्यासाठी प्रवासीहिताच्या योजना सुरू केल्या आहेत. मात्र, अधिकारी व कर्मचा-यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलबजावणी केवळ नावालाच होते. स्मार्टकार्ड प्रकरणावरून ही बाब स्पष्ट होते.
लवकर पूर्तता करू
- विभागीय कार्यालयाकडे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तीन हजार स्मार्टकार्डची मागणी केली होती. मात्र, वरिष्ठस्तरावरूनच 800 स्मार्टकार्ड मिळाले. ते आम्ही लाभार्थ्यांना वितरित केले. मागणीची पूर्तता होईल. एम.बी.पांडव, वाहतूक नियंत्रक, भुसावळ आगार