आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाट्य स्पर्धेत बॅकस्टेजवरही उत्साही बाल रंगकर्मींची धडपड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - १४ वी राज्य बालनाट्य स्पर्धा गंधे सभागृहात सुरू असून शहरातील रसिकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत अाहे. रंगमंचावरील कलावंतांसह बॅकस्टेजवरील चिमुकले उत्साही कलावंत माेठ्या प्रमाणात मेहनत घेताना दिसून येत अाहेत. नाटकातील महत्त्वाचा भाग असणारे नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा यासाठी बालकलावंताचा चांगलाच कस लागत अाहे.

बालनाट्यस्पर्धेत यंदा २९ नाटकांचे सादरीकरण हाेत असून हे बालकलावंत अापले नाटक कसे चांगले हाेईल, यासाठी कसून प्रयत्न करताना दिसून येत अाहेत. रगमंचावरील कलावंतांप्रमाणे पडद्यामागील कलावंतांचाही सहभाग तेवढाच ताकदीचा असणे अावश्यक आहे; हा सहभाग असला तरच ते नाटक पूर्णपणे यशस्वी हाेत असते. कलाकारांना हव्या त्या देणे, वेळाेवेळी मंचावरील सामान ब्लॅकअाउट दरम्यान बदलणे, नेपथ्य तयार करणे यासारख्या गाेष्टींकडे याेग्य लक्ष देणेही गरजेचे असून लहान मुले पूर्णपणे अापले कार्य उत्साहाने करताना दिसत अाहेत.

लहान मुलांची मांदियाळी
अापल्यासहकाऱ्यांना प्राेत्साहन देण्यासाठी शाळेतील इतर विद्यार्थ्यांची माेठी संख्या या वेळी सभागृहात दिसून येतेय. अापल्या शाळेतील कलावंतांचे सादरीकरण चांगले हाेण्यासाठीदेखील त्यांना शुभेच्छा मुलांतर्फे दिल्या जात असल्याने संपूर्ण सभागृह मुलांनी भरलेले अाहे.

स्वत:च प्राॅपर्टी अाणतात
पालक,शिक्षकांसाेबत येताना मुले नाटकासाठी लागणाऱ्या नेपथ्याच्या प्राॅपर्टी या स्वत: हातात घेऊन येत अाहेत. अापली जबाबदारी वाटून घेत मुले त्या वस्तूंचा याेग्य सांभाळ करीत अाहेत. त्याचप्रमाणे नाटक झाल्यावर स्टेजची स्वच्छता करणे, अापल्या वस्तू एकत्रित गाेळा करीत त्या घेऊन जाणे, असे मुलांचे नियाेजन दिसून येते. माेठ्यांच्या नाटकांप्रमाणेच अापल्या शिक्षक, दिग्दर्शकांच्या सूचनेप्रमाणे गाेंधळ करता शिस्तबद्धपणे मुले काम करत असल्याने शहरात बाल कलावंतांचीही फळी निर्माण हाेतेय.
बातम्या आणखी आहेत...