आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेसाेबत युती केल्यास मला विशेष अानंदच हाेईल! टीकेचे धनी झालेल्या खडसेंच्या भूमिकेत बदल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसाेबतची युती ताेडण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे टीकेचे धनी झालेल्या  माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेसाेबतच युती करावी, असा प्रस्ताव पालकमंत्र्यांकडे दिला अाहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असताना खडसे यांनी त्याच व्यासपीठावर अाता माझे युतीला समर्थन असल्याचे जाहीर केले. ‘शिवसेनेसाेबत युती केल्यास मला विशेष अानंद हाेईल’, असे विधानही त्यांनी केले.  काही गाेष्टी न जमल्यामुळे अापण सत्तेतून घरी बसल्याचा टाेलाही त्यांनी लगावला.

जळगावचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गुरुवारी भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बाेलत हाेते.  यावेळी माजी मंंत्री एकनाथ खडसे यांनी अनेक विषयांना स्पर्श करत स्वपक्षीयांवरच मार्मिक टीकाटिप्पणी केली. ‘सरकार नसताना अापण २० वर्षे जळगावची जिल्हा परिषद सांभाळली. 

अाता सत्ता अाहे अाणि चंद्रकांत पाटील, गिरीश महाजनांसारख्या मंत्र्यांची ताकद असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह अाहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला संपवण्यासाठी शिवसेनेसाेबत युती अावश्यक अाहे. लाट, वारा, उधाण याच्या भरवशावर निवडणूक लढवता येत नाही, त्यासाठी प्रत्यक्ष काम करावे लागते. माेदीजींच्या लाटेमुळे हवेत राहू नका, प्रत्यक्ष काम करा. यापूर्वी मी एकट्याने लढलाे अाहे, अाता साेबत अनेक नेते अाहेत. निवडून येण्याची क्षमता असलेले अनेक जण पक्षात येत अाहेत. परंतु, पक्षात डाेके वाढवताना त्यांचे चारित्र्यदेखील पाहा. चाेर, दराेडेखाेरांना घेऊ नका’, असा सल्लाही खडसे यांनी पाटील व महाजन यांचे नाव न घेता दिला.

‘मी अाणलेले प्रकल्प तरी पळवू नका’
‘जळगावला नवीन पालकमंत्री मिळाले अाहेत. ते जिल्ह्यात नवीन काय अाणतील हे माहीत नाही; परंतु जे प्रकल्प मी अाणले हाेते, ते पळविले जात अाहेत. ते थांबवून पूर्ण करण्यासाठी तरी प्रयत्न करा,’ असे साकडे माजी मंत्री एकनाथ खडसेंनी नूतन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना घातले. मुक्ताईनगरचे कृषी अवजारे इन्स्टिट्यूट अकाेल्याला हलविले अाहे. पाेलिस प्रशिक्षण केंद्राचा ९८ काेटींचा निधी वाया गेला. हाॅर्टिकल्चर काॅलेज रखडले. हिंगाेणात हाेऊ घातलेली टिश्युकल्चर लॅब रद्द झाली. कृषी विद्यापीठाचा प्रस्तावही पडून अाहे. व्हेटरनरी काॅलेज, अल्पसंख्याकांसाठीचे पाॅलिटेक्निक काॅलेज यासारखे शेकडाे प्रकल्प माझ्या राजीनाम्यानंतर थांबून असल्याचे खडसे म्हणाले.

पक्षाकडे गेलाे नाही, म्हणून घरी बसलो
‘जळगाव जिल्ह्यात १९९० च्या काळात पक्षाचा एकटाच नेता हाेताे. सत्ता नसतानाही तेव्हा जिल्हा परिषदेत सत्ता अाणली. अाता अापल्याकडे सत्ता अाहे, अनेक नेतेही तयार झाले. मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची ताकद साेबत अाहे. जुना बारीक कार्यकर्ता अाता जाडजूड झाला अाहे. पूर्वी सायकलवर फिरत असलेला कार्यकर्ता अाता चारचाकीतून फिरताे अाहे. कित्येकांना लाल दिव्याच्या गाड्या मिळाल्यात. त्यामुळे पक्षाकडे ताकद मागू नका. मी एकटाच लढलाे, कधी पक्षाकडे जात नव्हताे, म्हणूनच घरी बसलाे अाहे. पक्षाकडे गेलाे असताे तर अाज सरकारमध्ये असताे,’ अशी खंतही खडसेंनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...