आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील पहिला सौर प्रकल्प वाघूरवर!, गुजरातनंतर महाराष्ट्रात कालव्यावर उभारला जाणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- जळगावातीलवाघूर धरणाच्या डाव्या कालव्यावर राज्यातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पातून ७.५ मेगावॅट वीजनिर्मिती करण्यात येणार असून, त्यासाठी ३६ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. महाजेनको खासगी भागीदारीतून हा प्रकल्प उभारणार आहे. राज्य शासनाच्या नवीन अक्षय ऊर्जा धोरणांतर्गत सन २०१९-२०पर्यंत सौरऊर्जेतून १४ हजार ४०० मेगावॅट वीजनिर्मितीकरण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे
त्यासाठी काही ठिकाणी जमिनीवर सौरऊर्जा प्रकल्पही सुरू आहेत. मात्र, प्रथमच एका कॅनाॅलवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यातील वाघूर धरणापासून या प्रकल्पाला प्रारंभ केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य वीजनिर्मिती कंपनी लिमिटेड (महाजेनको) ही खासगी सहभागातून हा प्रकल्प उभारेल. त्यात वाघूर प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावर पहिल्या टप्प्यात १० किलोमीटरपर्यंत सोलार पॅनल लावले जातील. त्यातून ७.५ मेगावॅट वीजनिर्मिती होईल उपसा सिंचन योजनांसाठी कमी दरामध्ये ही वीज वापरता येईल. तसेच पाणीवापर संस्था आणि शेतकऱ्यांना १० टक्के वीजवापराचे अधिकार असतील.

अशा पद्धतीने कालव्यावर साैरऊर्जा प्रकल्प उभारला जातो
कालव्यावर सोलार पॅनल लावण्यामुळे भूसंपादनाची गरज पडणार नाही. त्यामुळे जमिनीची गरज नसल्याने प्रकल्पाचा खर्चही कमी येईल. तसेच या प्रकल्पामुळे कालव्यातील पाण्याचे बाष्पीभवनदेखील कमी होईल.

वाघूरच्या कॅनॉलवर सैऊर्जा प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला अद्याप मंजुरी दिलेली नाही. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप)अंतर्गत हा प्रकल्प असेल. या प्रस्तावाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे. खासगी भागीदार पुढे आल्यानंतर अंतिम मंजुरी देण्यात येणार आहे. -एकनाथखडसे, महसूलमंत्री

कालव्यावरचा देशातील पहिला प्रकल्प गुजरातमध्ये
गुजरातमधीलसरदार सरोवराच्या कालव्यावर सौरऊर्जानिर्मिती प्रकल्प सुरू आहे. गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी सन २०१२मध्ये हा प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पातून १.६ दशलक्ष मेगावॅट वीजनिर्मिती होत असून, दशलक्ष लिटर पाण्याचे बाष्पीभवन हाेत नाही. याशिवाय जानेवारी २०१५मध्ये वडोदरा जिल्ह्यातील कालव्यावर मोठी क्षमता असलेला सोलार प्रकल्प उभारण्यास प्रारंभ झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...