आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाडेकरूकडे चोरी; घरमालकाला अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील मिशन कंपाऊंडमध्ये भाडेतत्त्वावर राहणाऱ्या अनिल छाजेड यांच्या घरातून संसाराेपयोगी साहित्य चोरीस गेले हाेते. गेल्या महिन्यात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी छाजेड यांनी घरमालक त्यांच्या मुलावर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी छाजेड यांच्या तक्रारीवरून धुळे शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली आहे.
 
या विषयी अनिल नेमिचंद छाजेड (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या घरातील संसाराेपयोगी साहित्य घरमालक सुनील लुकस पाथरे, अमोल सुनील पाथरे यांनी कुलूप तोडून काढून घेतले. त्यात किराणा माल, कलर टीव्ही, गॅस सिलिंडर, भांडी आदींचा समावेश आहे. गेल्या महिन्यात १२ जुलैच्या रात्री दहा ते १५ जुलै रोजी साडेचार वाजेदरम्यान ही घरफोडी झाली. याबाबत विचारणा केली असता शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली, अशी तक्रार अनिल छाजेड यांनी दिली आहे. त्यावरून घरमालक सुनील पाथरे अमोल पाथरे यांच्याविरुद्ध भादंवि कलम ४५४, ४५७, ३८०, ५०४ अन्वये धुळे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या संसाराेपयोगी साहित्याची किंमत पोलिसांनी २५ हजार २५० रुपये आकारली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनील पाथरे या संशयिताला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
बातम्या आणखी आहेत...